Assembly Election 2024 : विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केली रणनीती

Bharat Gogawale's statement : शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी माध्यमाशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होईल, असे बेधडकपणे सांगून टाकले
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 17 September : महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक कधी लागणार, याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी थेट आचारसंहिता लागू होण्याची तारीखच सांगून टाकली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून फुंकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) जाहीर होत असते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी केवळ हरियाणा विधानसभेचीच निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते.

सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर (Election Commission) लावण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचे कारण देऊन विधानसभेची निवडणूक जाहीर केली नाही, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याच वेळी दिले होते.

Bharat Gogawale
Mahayuti Election Strategy : महायुती जिंकणार 170 जागा; चंद्रकांतदादांनी सांगितलं आकड्यांचं गणित...

दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद, आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी माध्यमाशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होईल, असे बेधडकपणे सांगून टाकले, त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत विधानसभेसाठी निवडणुकीचा प्रचार रंगण्याची शक्यता आहे. काही दिवस प्रचार होऊन विधानसभेसाठी मतदान होईल.

आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची आशा आता सोडून दिल्याचे विधान केले आहे. येत्या पाच तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे आता किती दिवस राहिलेत, असा प्रश्न करून मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता गोगावले यांनी फेटाळून लावली. एकंदरीतच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वाढली आहे.

Bharat Gogawale
Shikhar Pahadia : सुशीलकुमार शिंदेंचा सेलिब्रिटी नातू अखेर सोलापूरच्या मैदानात; युवक काँग्रेसचा विधानसभेसाठी आग्रह

ज्या गोष्टी नशिबात असतात, त्या घडत असतात. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज वगैरे काही नाही. मंत्रिपदं किती आणि लोकं किती हे बघून आम्ही आतापर्यंत चालत आलो आहे. येत्या पाच तारखेला आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे हातात किती दिवस राहिले आहेत, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनीच केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com