Mahayuti News : कोकणात महायुतीला मोठा धक्का; भाजपने 'या' दोन मतदारसंघातला प्रचारच थांबवला

Political News : महाविकास आघाडी व महायुतीने प्रचारासाठी राज्यभर जोर लावला आहे. त्यातच ऐन निवडणूक काळात कोकणामध्ये महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने दोन मतदारसंघातील प्रचार थांबवला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. महाविकास आघाडी व महायुतीने प्रचारासाठी राज्यभर जोर लावला आहे. त्यातच ऐन निवडणूक काळात कोकणामध्ये महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने दोन मतदारसंघातील प्रचार थांबवला आहे.

शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. फक्त गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Uddhav Thackeray : 'अदानींसाठी जमिनी शोधत होते, केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गचं चांगलं होईल'; ठाकरेंचा घणाघात

मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचे काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. “रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ”, अशी आक्रमक भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. “विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. रामदास कदम आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची मिलीभगत आहे”, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Mahayuti News : महायुतीच्या नेत्यानं राज ठाकरेंचा दावा खोडला; म्हणाले, 'शरद पवार जातीपातीचं राजकारण करत नाही!'

कोकणातील दापोली मतदार संघातून योगेश कदम तर गुहागरमधून रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी देण्यासाठी रामदास कदम यांचा डाव आहे. असादेखील आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

मनधरणीचे प्रयत्न सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विपूल कदम हे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गुहागरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची आता भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित आहेत. या बैठकीत काही मार्ग निघतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुद्दाम 'टार्गेट'? आधी बॅगांची तपासणी, आता राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट ताफाच अडवला

निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपला जबाबदार धरू नये, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुती समोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची समजूत वरिष्ठ नेते कशी काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, devendra Fadanvis
Navneet Rana : मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांचा इशारा नवनीत राणांनी झुगारला; महायुतीच्या विरोधात प्रचार सुरूच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com