Pune News : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण सुरू केली असल्याची टीका केली होती. त्यासोबतच जाती-जातीबद्दल द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला आहे, असे देखील ते म्हणाले होते. याबाबत केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता त्यांनी शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रामदास आठवले म्हणाले, 'मी आज सांगोल्याला गेलो होतो. तसेच दोन दिवसांपूर्वी लातूरला देखील गेलो होतो. त्या दोन्ही ठिकाणी माझे हेलिकॉप्टर आणि बॅग चेक करण्यात आल्या. हा विषय निवडणूक आयोगाचा आहे. तो सरकारचा अजिबात नाही. फक्त शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर चेक केले असे नाही. त्यामुळे या विषयाची राजकीय भीती निर्माण करू नये, अशा गोष्टींना आपण सामोरे गेले पाहिजे,' अशी टीका रामदास आठवले यांनी ठाकरे यांच्यावर केली.
विधानसभा निवडणुकीच्या महायुतीच्या जागा वाटपामध्ये माझ्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. 4 ते 5 जागा मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा होती. कमी जागा मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र, आपल्याला सत्तेत सहभाग मिळणार आहे. महामंडळ आणि काही मंत्रीपद मिळतील, असे मी त्यांना सांगितले आहे. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागलेले आहेत. त्यासोबतच ज्यांनी कामाला सुरुवात केलेली नाही, त्यांनी महायुतीचे काम सुरू करावे, असा सूचना देखील रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनी दिल्या.
जागा वाटपामध्ये यापुढे आमच्यावर अन्याय होऊ नये. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आठवले पुढे म्हणाले, परदेशात गेले की काँग्रेसचे नेते राहुल गांधींना वेगळे विषय सुचतात. यावेळी आम्ही आरक्षण रद्द करू, असे त्यांनी अमेरिकेत सांगितले होते. नरेंद्र मोदी किंवा एनडीए कदापि आरक्षण रद्द करणार नाहीत. राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे ते आरक्षण रद्द करायला निघाले तर आम्ही त्याला विरोध करू, असे आठवले म्हणाले.
शरद पवारांवर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, 'शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात असे मला वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. शरद पवारांवर करण्यात आलेला आरोप मान्य नाही. मात्र, काँग्रेसने जातीवाद संपवण्याचे काम केले नाही. तो संपुष्टात यावा, अशी आमची अपेक्षा आहे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.