BJP MLC Candidate : भाजपमधील मोठ्या नेत्याचा पत्ता कट? विधान परिषदेसाठी 6 दावेदार पण एकालाच संधी; प्रवक्ता किंवा मैदानावर लढणार कार्यकर्ता...

BJP Vidhan Parishad Meeting : भाजपमध्ये सध्या इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचं हा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर आहे. कारण विधानसभा निवडणुकी वेळी बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाने दिला होता.
BJP Core Committee Meeting | MLC Candidate Selection
Senior BJP leaders arrive at Varsha bungalow for the core committee meeting to discuss MLC candidate selection ahead of elections.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 22 Apr : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मात्र, भाजपमध्ये सध्या इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचं हा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर आहे. कारण विधानसभा निवडणुकी वेळी बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाने दिला होता.

शब्द दिलेल्यांपैकी आता एक नाहीतर दोन जणांनाच संधी देणं शक्य आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांसाठी 100 प्रबळ दावेदार असताना विशिष्ट व्यक्तींना उमेदवारी देताना इतरांची नाराजी कशी टाळायची याचं टेन्शन नेत्यांना आलं आहे.

BJP Core Committee Meeting | MLC Candidate Selection
Vidhan Parishad Candidate : विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची नावे फिक्स! 'या' 12 जणांमधून होणार निवड? यादी आली समोर!

एकीकडे पक्षसंघटनेतून किमान एकाला संधी द्यावी अशी भावना आहे. वर्षानुवर्षे पक्षसंघटनेत काम केलेल्यांना यापूर्वी विधान परिषदेची संधी दिली गेली होती. यावेळी असे सहा प्रबळ दावेदार असून त्यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे पक्षसंघटनेत प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणाऱ्यांना संधी द्यायची की प्रवक्त्यांपैकी एकाला संधी द्यायची याची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. संघटनेत काम करणाऱ्यांना लोकांमधून विधानसभा किंवा लोकसभेत निवडून जाण्याची संधी नसते. त्यामुळे त्यांचा विचार विधान परिषदेसाठी करावा, अशी मागणी केली जात आहे.

BJP Core Committee Meeting | MLC Candidate Selection
Girish Mahajan : काल 'गेट आऊट फ्रॉम हेअर' म्हणालेल्या महिलेवर मंत्री महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "त्रास झाला मान्य, पण बाटली फेकून मारली हे..."

दरम्यान, पक्षसंघटनेत काम करणाऱ्या संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका वरिष्ठ नेत्याला संधी दिली जाणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजप हे जागा वाटपाचं कोडं नेमकं कसं सोडवणार आणि विधान परिषदेसाठी कोणती नावं फायनल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com