'राऊतांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे का उपस्थित नव्हते?'

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. काल (ता.16 फेब्रुवारी) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घोषणा केलेली व राज्यभर चर्चा झालेली पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. यावर भाजपनेत्यांकडून पत्रकार परिषद संपल्यापासून (ता.15 फेब्रुवारी) राऊतांवर टीका करत असून त्यांच्या त्यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत आहेत. यामध्ये किरीट सोमय्या, (Kirit Somaiya) प्रविण दरेकर, (Pravin Darekar) सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) मोहित कुंबोज आदिंनी राऊतांच्या आरोपांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही (Chandrakant Patil) आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी थेट शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदेंचे नाव घेत ते कालच्या पत्रकार परिषदेला का उपस्थित नव्हते?, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवले आहे.

Chandrakant Patil-Sanjay Raut
संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचयं! उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली सुरूंग पेरतायेत!

पाटील म्हणाले, अडीच वर्षापूर्वी राऊतांनीच शिवसेनेला हुलीवर घातल आहे. ते शिवसेनेची वाट लावणार असून खड्यात घालणार आहेत. राऊत म्हणतात की, मोहीत कंबोज हे फडणवीसांना घेऊन डुबणार पण त्यांची तुम्ही काळजी करू नका. राऊतच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार आहेत. शिवसेनेला काल त्यांचे नेते गोळा होत नव्हते. त्यामुळे मोठ्या मुश्किलीने माणसे जमवावे लागली. राऊतांबरोबर कालच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते?, असा थेट सवाल उपस्थित करत पाटलांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर बोट ठेवत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chandrakant Patil-Sanjay Raut
सरपंचांनी सोमय्यांना पाडलं तोंडावर; दावा केलेल्या जागेचं सांगितलं वास्तव

दरम्यान, राऊतांच्या कालच्या पत्रकार परिषदेवर भाजपच्या अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. यामध्ये प्रदेश भाजपचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनीही राऊतांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. ते म्हणाले की, राऊतांनी पत्रकार परिषद घेण्यापुर्वी माझ्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल, असे जाहीर केले होते. मात्र, आम्ही या पत्रकार परिषदेची वाट पाहत आहे. आता एका अर्थाने राऊत यांनी काका मला वाचवा इतकेच म्हणायचे बाकी राहिले आहे. तसेच, शिवसेनेने त्यांची पत्रकार परिषद वा-यावर सोडली हे काल सिद्ध झाले. पांडवांनीच अभिमन्यूचा वध करावा अशी स्थिती आता त्यांची झाली आहे, अश्या शब्दाच भारतीय यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com