'बेल मारली की मिलिंद नार्वेकर हजर.. काय पाहिजे साहेब?'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते.
Narayan Rane, Milind Narvekar
Narayan Rane, Milind Narvekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते आज (ता.१६) मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यालयात बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत यांच्या बरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा चांगलाच समाचार घेतला.

राणे म्हणाले, संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. त्यांची लायकी आहे का? राऊत यांच्यावर थोडा तरी परिणाम झाला आहे. आता ते भारताचे राहिले नाहीत. ते भारताबाहेरचे झाले आहेत. त्यांची तपासणी करण्याची वेळ आली आहे. राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांच्यासोबत कुणीच नव्हते. साधा विभागप्रमुखही सोबत नव्हता.

Narayan Rane, Milind Narvekar
'राऊतांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे का उपस्थित नव्हते?'

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे मोठे नेते आहेत. त्यावर राणे यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करत हो? मिलिंद नार्वेकर का? ते तर पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचे काम करत होते. मी स्वत: पाहिले आहे. बेल मारली की ते हजर. काय पाहिजे साहेब?, असे विचारत असत. असे म्हणणारे आता नेते बनले आहेत. काय अपग्रेडेशन स्पिड आहे हो!, असे राणे म्हणाले.

संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये शब्द वापरले त्याची आम्ही दखल घेतलेली आहे. प्रत्येक पक्ष विचार करत असतो की आपण सत्तेमध्ये यावे, त्याच प्रमाणे भाजपही करत आहे त्यात चुकीचे काय आहे. आम्ही कायम राज्यत विरोधी पक्षात राहणार नाही, आज नाही तर उद्या आम्ही सत्ता मिळवू. कायद्याचा वापर कसा करायचे हे आम्हाला पण माहीत आहे, असे सांगत राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.

Narayan Rane, Milind Narvekar
संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचयं! उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली सुरूंग पेरतायेत!

प्रवीण राऊत यांची ईडीने चौकशी केली, त्यानंतर राऊत घाबरले. प्रवीण राऊत यांनी ईडीला असे काय सांगितले की ज्यामुळे राऊत यांना घाम फुटला, असा सवाल राणे यांनी केला. सेनाभवनातील कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनाप्रमुख जणू काही आपणच झाले आहोत, असा संजय राऊत यांचा आवेश होता. हा व्यक्ती शिवसेना वाढविण्यासाठी नाही तर यांचे लक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत हा राष्ट्रवादीचा पूर्ण माणूस आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना हे कळत नाही, राऊत हे शिवसेनेमध्ये सुरुंग लावत आहेत, असेही राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com