MLC Election : एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी भाजप 'अ‍ॅक्टिव्ह', 'अप्पा पॅटर्न'ला राजीव पाटलांच्या माध्यमातून उत्तर

Eknath Shinde Vs BJP Mlc Election : एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या संभाव्या युतीला रोखण्यासाठी भाजप अ‍ॅक्टिव झाली आहे. बविआचे माजी महापौर राजीव पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने दाखवल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde Faces BJP Challenge Over Thane-Palghar Constituency
Eknath Shinde Faces BJP Challenge Over Thane-Palghar ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Rajiv Patil News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ठाणेच्या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी ताकद लावली आहे. तर, भाजप देखील ही जागा आपल्याला मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.

एकनाथ शिंदेंनी थेट बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याची तयारी केली आहे. बविआचे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. बविआचे 71 नगरसेवक आहेत. हे शिवसेनेच्या सोबत आले तर शिवसेनेची ताकद वाढणार आहे. हितेंद्र ठाकूर (अप्पा) यांच्यासोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे आणि हिंतेंद्र ठाकूर एकत्र आले तर भाजप समोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. हे ओळखून अप्पा पॅटर्नला उत्तर देण्यासाठी भाजप देखील अॅक्टिव्ह झाली आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्यासोबत भाजपने बोलणी सुरु केली आहेत.

भाजप आमदार राजन नाईक आणि भाजप खासदार हेमंत सावरा यानी नुकतीच राजीव पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे.

राजीव पाटील यांना उमेदवारी दिली तर बहुजन विकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे-हितेंद्र ठाकूर यांच्या छुप्या युतीला मोठा बसेल, अशी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीव पाटील आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्या होत्या. राजीव पाटील यांच्या उमेदवारीसाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, हितेंद्र ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी राजीव पाटील यांची समजूत घातली होती. त्यामुळे कुटुंबातील फूट थांबवी होती. राजीव पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतली होती. त्यामुळे आता पुन्हा आमदारकीची संधी भाजपकडून मिळण्याची चर्चा असताना राजीव पाटील काय निर्णय घेणार याची चर्चा आहे.

Eknath Shinde Faces BJP Challenge Over Thane-Palghar Constituency
MLC Election : 'अप्पा फॅक्टर' गेमचेंजर! शिवसेनेचा आमदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंची भाजपशी टक्कर? 'स्थानिक'च्या आकडेवारीमुळे धाकधूक वाढली!

'बविआ' गेमचेंजर

ठाणे जिल्ह्यात भाजपकडे 444 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 346 नगरसेवकांचे बळ आहे. भाजप शिवसेनेपेक्षा पुढे असली तरी बविआचे 71 नगरसेवकांची संख्य महत्त्वपूर्ण ठरते आहे. त्यामुळे बविआचे नगरसेवक हे गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde Faces BJP Challenge Over Thane-Palghar Constituency
Shinde-Thakur Yuti : एकनाथ शिंदे अख्खा पक्ष गळाला लावण्याच्या तयारीत! 'अप्पां'नी डाव उधाळला, छुपी युती अन् भाजपचीही कोंडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com