उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात राज ठाकरेंना नो एंट्री!

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंना पुन्हा आव्हान
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. असे असले तरी त्यावरून सुरू असलेला गदारोळ कायम आहे. आधी या दौऱ्याला विरोध करणारे अयोध्येतील भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना पुन्हा आव्हान दिलं आहे. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय एंट्री नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुजरातमध्येही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास देण्यात आला पण त्यांच्याकडून कुणीही माफी मागितली नाही, असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. यावर बोलताना बृजभूषण म्हणाले की, गुजरात, पंजाबमध्येही उत्तर भारतीयांना त्रास देण्यात आला. पण महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात दहशतीचे, द्वेषाचे वातावरण राज ठाकरेंनी तयार केले. त्या तुलनेत गुजरात, पंजाबमध्ये एवढा त्रास दिला नाही. राज ठाकरेंनी हिंदी भाषिकांना खूप त्रास दिला आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारत राज ठाकरे यांच्याविरोधात उभा राहिला आहे. हा वाद सुरू झाल्यापासून मला एकाही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याने संपर्क केलेला नाही.

Raj Thackeray
तुरुंग की पंचतारांकीत हॉटेल? सिद्धूंना मिळतोय महागडा आहार

मी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली नाही. असे असते तर भाजपच्या एकातरी नेत्याचा मला फोन आला असता. मला आजपर्यंत मनाई करणारा किंवा समर्थन करणारा एकही फोन आलेला नाही. याचा अर्थ म्हणजे माझी भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे. मी पहिला रामाचा वंशज आहे, त्यानंतर अयोध्यावासी, उत्तर भारतीय आणि मग मी भाजपचा कार्यकर्ता आहे, असेही बृजभूषण यांनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray
माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा

राज ठाकरेंना माफी मागायला सांगितल्यापासून दररोज मनसे कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत. ते उर्मटपणे बोलतात, पण मी कधीच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत नाही. मला त्या कार्यकर्त्यांची कीव येते. राज ठाकरेंनी स्पष्टपणे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव घ्यावे. कुणी सापळा रचला त्यांचे नाव घेण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे, असा प्रश्नही बृजभूषण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com