Uddhav Thackeray News: भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं वाढवलं ठाकरेंचं टेन्शन; दोन खासदार संपर्कात असल्याचा दावा

Piyush Goyal News: विधिमंडळात ठाकरे गटाकडे हम दो हमारे दोन असंच संख्याबळ राहणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं. याचदरम्यान, मागील नऊ महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सातत्यानं धक्के दिले जात आहेत. अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोपांनी दोन्ही गटातला वाद विकोपाला गेला असतानाच ठाकरेंना आपल्या पक्षाला लागलेली गळती रोखण्यात अद्यापही यश आलेलं नाही.

याचदरम्यान आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उध्दव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारं मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल( Piyush Goyal ) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकारणावर रोखठोक भाष्य केलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

Uddhav Thackeray
Amit Shah's Big Statement: अमित शाह यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'' नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर...''

गोयल म्हणाले, काही मोजके खासदार सोडले तर त्यांचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. आता ठाकरे गटात उऱलेल्या खासदारांपैकीही आणखी दोन जण आमच्या संपर्कात आहेत अशी माहिती मला मिळाली आहे. यामुळे ठाकरे गटाकडे विधिमंडळात हम दो हमारे दोन असंच संख्याबळ राहणार आहे. फक्त आडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती करेल असंही गोयल म्हणाले.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार आहे. ठाकरेंनी त्याच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचं सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाहीत असंही स्पष्टीकरण गोयल यांनी यावेळी दिले.

Uddhav Thackeray
Chhatrapati Sambhajinagar Riot: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा ; राम मंदिराबाहेरची कमान जाळली..

उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे. तसंच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन हिरो आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींचंही कौतुक केलं आहे. मोदींच्या नेतृत्वात आपण 2047 पर्यंत विकासाचा मोठा टप्पा गाठू असा विश्वासही केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com