Maharashtra Politics : शिंदेंकडून भाजपची कोंडी; शिवसेनेसाठी माघार घ्यावी लागणार?

Milind Deora News : मिलिंद देवरा हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी (ता. १४ जानेवारी) शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करीत काँग्रेसला धक्का दिला. मिलिंद देवरा हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या प्रवेशामुळे शिंदे गटाने भाजपची कोंडी केल्याचे मानले जात आहे. आता भाजपला शिवसेनेसाठी माघार घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे. (BJP's withdrawal from South Mumbai constituency for Shiv Sena?)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. सगळ्याच पक्षांकडून जागांची चाचपणी सुरू केली गेली आहे. दक्षिण मुंबई जी सगळ्यात महत्त्वाची जागा आहे, यासाठी तीन पक्षांमध्ये आता शर्यत सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Shahajibapu News : शहाजीबापूंंनी गणपतआबांच्या नातवाला ललकारले; आजोबाला जे जमलं नाय, ते नातवाला काय जमायचं?

दक्षिण मुंबईमधील विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीकडून होत आहे. मात्र, ही मूळ जागा काँग्रेसची आहे आणि देवरा कुटुंबीय इथून निवडून येत असल्याचा दावा मिलिंद देवरा यांनी केला होता. महाविकास आघाडीमधून ही जागा मिळत नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्याविरोधात भाजप त्यांचा उमेदवार देण्यासाठी इच्छुक होते. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेना आणि भाजपची युती असताना अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईत निवडून आले होते.

मात्र मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपची कोंडी झाल्याचे चित्र आहे. महायुती म्हणून जर एकत्र लढायचं असेल तर भाजपला माघार घ्यावी लागणार असल्याचं दिसून येतं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षासाठी भाजप माघार घेणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Solapur Mahayuti Melava : हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीच्या विजयाची वज्रमूठ बांधा : चंद्रकांतदादांचे आवाहन

सावंतांच्याविरोधात शिवसेनेचा शड्डू

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आता जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्य लढत ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना असणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात आता मिलिंद देवरांना उभं करण्याची रणनीती दिसून येत आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Mahayuti Melava : देवरा यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे राहुल गांधींचे अपयश; राणेंचा हल्लाबोल

देवरा हे याआधीही दक्षिण मुंबईत निवडून येत होते. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या युतीत अरविंद सावंत यांचा विजय झाला. दक्षिण मुंबईची जागा जागा 'मविआ'मध्ये काँग्रेसला मिळावी, अशी वारंवार मागणी देवरांची होती; परंतु ही जागा शिवसेनेला जात आहे, हे कळल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता भाजपवर माघार घेण्याची वेळ आली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Pandharpur News : शरद पवार गटाचा मोठा नेता अडचणीत; अभिजित पाटलांसह २१ संचालकांविरोधात राज्य बॅंकेची तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com