Mumbai Political News : मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात चार हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र त्या चार हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्धच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कोविड काळात महापालिकेच्या कारभारात काळंबेरं झाल्याची चर्चा आहे.
आयुक्त चहल यांनी केलेल्या दाव्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कोविड काळातील सादर अहवालाची प्रत मागितली होती. गलगली यांच्या अर्जानुसार दिलेल्या उत्तरातून कोविड काळात झालेल्या चार हजार कोटींच्या खर्चाची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आयुक्तांनी केलेल्या दावा खरा की खोटा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेची अशी ही टोलवाटोलवी !
कोविड काळातील खर्चाबाबत गलगली यांनी आयुक्त कार्यालयाला अर्ज दिला होता. हा अर्ज आयुक्त कार्यालयाने उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला. उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) लालचंद माने यांनी अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज उप आयुक्तांकडे (सार्वजनिक आरोग्य) हस्तांतरित केला.
प्रशासकीय अधिकारी चि. गे. आढारी यांनी अर्ज प्रमुख लेखापाल (वित्त) यांसकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला.
एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असून केंद्रीय पथक आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी करत आहे तर दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त 4 हजार कोटींचा हिशोब देत नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी कोविड काळातील खर्चाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.