BMC vehicle purchase news : BMC चा 'शाही' कारभार! स्कॉर्पिओऐवजी 'इनोव्हा'चा अट्टाहास, गाड्यांच्या खरेदीवर उधळपट्टी

BMC vehicle purchase news : स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा खरेदी करण्याच्या BMCच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारी खर्च आणि सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
BMC vehicle purchase news : BMC चा 'शाही' कारभार! स्कॉर्पिओऐवजी 'इनोव्हा'चा अट्टाहास, गाड्यांच्या खरेदीवर उधळपट्टी
Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई महापालिकेच्या वाहन खरेदीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पालिकेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी सध्या असलेल्या स्कॉर्पिओ एन वाहनांऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, या निर्णयावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महागड्या वाहनांच्या खरेदीमुळे सार्वजनिक निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप केला जात आहे.

उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला प्रशासनाने प्राथमिक स्तरावर मान्यता देत तो अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक वाहनाची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

BMC vehicle purchase news : BMC चा 'शाही' कारभार! स्कॉर्पिओऐवजी 'इनोव्हा'चा अट्टाहास, गाड्यांच्या खरेदीवर उधळपट्टी
Sonu Sood on Kangana Ranaut : 'Gen-Z' वादावर सोनू सूद यांचे कंगना राणावत यांना सूचक प्रत्युत्तर; 'जनता सोबत असेल, तोपर्यंतच...'

पालिकेतील निवडणुकांनंतर विविध समित्यांची पुनर्रचना झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या अधिकृत कामकाजासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांसाठी यापूर्वीच सुमारे 30 ते 35 लाख रुपये किमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली आहे. तर इतर पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ एन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, स्कॉर्पिओ एन वाहनातून प्रवास करताना अनेक अडचणी जाणवत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. वाहनाची उंची, रस्त्यांवरील धक्के आणि दीर्घ प्रवासादरम्यान होणारा शारीरिक त्रास यामुळे इनोव्हा क्रिस्टा अधिक आरामदायी असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. अधिकृत बैठका, पाहणी दौरे आणि शहरातील सततच्या प्रवासासाठी हे वाहन अधिक उपयुक्त ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.

याच प्रस्तावात विरोधी पक्षनेत्यांनाही समान दर्जाची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी एकाच प्रकारची वाहने उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

BMC vehicle purchase news : BMC चा 'शाही' कारभार! स्कॉर्पिओऐवजी 'इनोव्हा'चा अट्टाहास, गाड्यांच्या खरेदीवर उधळपट्टी
Land Compensation : शेतकऱ्यांना मोबदला न देणाऱ्या PWD ला न्यायालयाचा दणका, कार्यालयावर जप्ती; मोठ्या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, नवीन इनोव्हा क्रिस्टा गाड्यांच्या खरेदीला मंजुरी मिळाल्यास सध्या वापरात असलेल्या स्कॉर्पिओ एन वाहनांचे पुढे काय होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. ही वाहने कार्यकारी अभियंत्यांच्या सेवेसाठी वापरण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी पालिकेच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि सार्वजनिक कामांसाठी निधी खर्च करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांसाठी महागडी वाहने खरेदी करण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com