Raj Thackeray : ''आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा अन् काय ते एकदाच होऊन जाऊ द्या''

Mumbai : ''उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत तिकडे सभा घेत बसू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर राज्यासाठी काम करा''
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज मुबंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, ''माझ्या मनात पक्ष काढण्याचं नव्हत. पण अनेक लोकं माझ्याकडे यायला लागले. त्यानंतर मी पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक गोष्टी झाल्या, घरातूनही राजकारणातून झालं. आता उद्धव ठाकरे हे लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत फिरत आहेत. पण हे सांगण्याआधी जर तुम्ही काय राजकारण केलं हे सांगा'', अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Raj Thackeray
Raj Thackeray : शिवसेनेत जे राजकारण चालू होते, त्याचा शेवट म्हणजे शिंदेंचे बंड; राज ठाकरेंनी सगळेच सांगितले

''उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजपबरोबर युती केली. मात्र, निकालानंतर म्हणाले अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या. मग तुम्ही निकालानंतर का म्हणता? प्रचारावेळी तुम्ही का सांगितलं नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या लोकांनी काय करायचं? ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं? राजकारणात काय चाललंय?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.

''एकनाथ शिंदे हे सुरतला गेले. सध्या शिवसेनेचं काय झालं? हे महाराष्ट्र पाहत आहे, पण हे बाळासाहेब ठाकरे असते तर हे घडलं नसतं. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपेल की नाही माहित नाही'', असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना लगावला.

Raj Thackeray
Bala Nandgaonkar : ''शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंकडे असते तर राणे, शिंदे यांच्यासह 40 आमदार फुटून गेले नसते''

''उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत तिकडे सभा घेत बसू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर राज्यासाठी काम करा'', असं म्हणत राज ठाकरे यांनी शिंदेंना सुनावलं. तसेच ''आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा आणि काय ते एकदाच होऊन जाऊ द्या'', असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com