Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : छगन भुजबळांना शरद पवारांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत बसावे लागले...

NCP Leader News : छगन भुजबळ हे भेटीची पूर्वपरवानगी न घेताच शरद पवार यांना भेटायला ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले होते.
Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 15 July : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर गेले आहेत. मात्र, भुजबळांना भेटीसाठी तब्बल दीड तास वाटत थांबावे लागले. सुमारे पावणेबाराच्या सुमारास भुजबळ यांना पवारांनी भेटीसाठी आतमध्ये बोलावले. त्यामुळे पवार-भुजबळ भेटीची उत्सुकता उत्कंठा वाढवत आहे.

बारामती येथे रविवारी (ता. 15 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान रॅलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांना भेटण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर (Silver Oak) पोचले आहेत. मात्र, दीड तास भुजबळ यांना भेटीची वेळ मिळू शकलेली नव्हती.

छगन भुजबळ हे भेटीची पूर्वपरवानगी न घेताच शरद पवार यांना भेटायला ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले होते. मात्र, पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते गेल्या दोन दिवसांपासून कोणालाही भेटत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पूर्ण विश्रांती घेत आहेत. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांना आज शरद पवार यांनी भेटीची वेळी दिली होती. त्यानुसार ते आज सकाळी शरद पवार यांना भेटून गेले आहेत.

छगन भुजबळ मात्र भेटीची वेळ न घेताच पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’वर पोचले आहेत. मात्र, पवारांनी गेल्या दीड तासापासून भुजबळांना भेटीसाठी आतमध्ये बोलावले नव्हते. त्यामुळे भुजबळ यांना शरद पवार यांची वाट पाहात बसावे लागले होते. तब्बल दीड तासाच्या प्रतिक्षेनंतर छगन भुजबळ यांना सिल्व्हर ओकमध्ये प्रवेश मिळाला आहे.

भुजबळ- पवार भेटीवर अजितदादा गटाची प्रतिक्रिया

शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना भेटायला जायला किमान छगन भुजबळ यांना तरी विचारून (परवानगी) जाण्याची गरज नाही. राज्यातील विविध पक्षांची नेतेमंडळी शरद पवारांना भेटत असतात, तशीच ही भेट आहे. त्यामुळे शरद पवार यांना भेटायला छगन भुजबळ हे ‘सिल्व्हर ओक’वर गेले, त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असा खुलासा भुजबळ-पवार भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com