Chhagan Bhujbal : ‘त्या’ ऑफरवर भुजबळांचा तिखट हल्ला; म्हणाले ‘तो माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार..’

Governor Post Offer : मी राज्यपाल होऊन काय करू? मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे, अशी तिखट भावना भुजबळांनी व्यक्त केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 01 February : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. माझ्या मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे, असू सांगून त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला. तसेच, राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखे आहे, असेही विधानही भुजबळ यांनी केले आहे, त्यामुळे भुजबळांनी राज्यपालपदाची ऑफर नाकारली का? ती ऑफर कोणाकडून हेाती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादीवर विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज झाले आहेत. मंत्रिपद न मिळालेले भुजबळ यांनी राज्यसभा सदस्य आणि राज्यपालपदाबाबत भाष्य केले आहे. मी राज्यपाल होऊन काय करू? मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे, अशी तिखट भावना भुजबळांनी व्यक्त केली.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांना राज्यसभेवर संधी देण्याची अथवा राज्यपाल (Governor) करण्याची चर्चा महायुतीच्या वर्तुळात सुरू होती. याबाबत भुजबळ यांनी प्रखर भाषेत आपली भावना व्यक्त केली आहे. राज्यातील गरीब लोकांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांच्यासाठी सरकारशी भांडणं हे माझे काम आहे. मी जर राज्यपाल झालो तर त्यांच्या समस्या कशा सोडवू, असा सवालही भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal
Eknath Shinde On Budget : लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या... : एकनाथ शिंदेंकडून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे अभूतपूर्व स्वागत

राज्यपालपदाचा मला अपमान करायचा नाही. सर्वसमान्य जनतेच्या समस्या मी राज्यपाल झाल्यावर सोडवू शकणार आहे का? त्यामुळे मी मोकळा आहे, तेच बरा आहे, असे सांगून आपल्याला राज्यपालपद नको, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी नाशिकमधून मला लढविण्याबाबत सांगण्यात आले होते. तुमचं नाशिकमध्ये चांगलं काम आहे, त्यामुळे नाशिकमधून तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, असा आग्रह मला करण्यात आला होता. मात्र, उमेदवारीसाठी शेवटपर्यंत घोळ करण्यात आला, त्यामुळे नाशिकमधून मीच माघार घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बिहारसाठी घोषणांचा पाऊस; नितीशकुमारांना खूष करत मतांसाठी पेरणी

मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या यादीत माझे नाव येईल, असे मला वाटले होते. मात्र, जेव्हा मानसन्मानाला धक्का लागतो, तेव्हा ते योग्य ठरत नाही. पक्षात अजित पवारांना पाठिंबा देणारा पहिला मी होतो, असेही सांगताना त्यांनी अजित पवारांचे नेतृत्व मात्र चांगले आहे, असा दवाही भुजबळ यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com