

Mumbai : आधीचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन दोन पेन आहेत. मी रस्त्यावरही लोकांच्या कामासाठी सह्या केल्या. तुम्ही सरकार चालवायचं स़ोडवून गाडी चालवत होता. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नाहीत, त्या मी एक दिवसात केल्या. रिक्षावाल्याने ठाकरेंच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी गोरेगाव येथील शिवसेनेच्या वर्धापन दिनात सोमवारी (दि.१९) बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली. शिंदे म्हणाले, आम्ही आरोपांना उत्तर कामातून देणार आहे . तेच टोमणे, तेच आरोप नवीन काही नाही. त्यांना निदान नवीन स्क्रिप्ट तरी बदलायला सांगा असा टोलाही शिंदेंनी लगावला. शिंदे म्हणाले, उध्दव ठाकरे तुम्ही कुठे होता. किती केसेस झाल्या आहेत असा सवाल ठाकरेंना विचारला. महाराष्ट्र माझा परिवार आहे. रिक्षावाला - शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास कष्ट, मेहनत आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच झालो आहे. सर्व आरोपांना आम्ही कामातून उत्तर दिले.
शिंदे म्हणाले, कुणी रिक्षावाला, कुणी भाजीपाला विक्रेता आहे अशाच सर्वसामान्य फाटक्या लोकांना सोबत घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. ज्यांना तुम्ही हिणवताय तो बाळासाहेबांचा अवमान आहे. श्रीकांत डॉक्टर झाला.यावेळी त्याने माझ्याकडे एकच मागणी केली. तो म्हणाला, मला एक हॉस्पिटल बांधून द्या., पण ते ही मी नाही करु शकलो. कारण हॉस्पिटलचं काही काम निघालं की, सभा यायची. आणि ते तसंच राहिलं.
यावेळी कर्ज काढून मी निवडणुका लढवल्या. ठाकरेंनीच गद्दारी केली फक्त तारीख विसरले. आम्ही गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला. घराबाहेर शिवसेना(Shivsena) काढण्याचं काम केलं.
नादी लागू नका ही आग आहे. हे टपरीवाले, भाजीपालावाले, चहावाले अशाच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. ते त्वेषानं काम करत आहेत. तुम्ही आरोप करत राहा आम्ही काम करत राहू असा टोमणाही शिंदेंनी लगावला. तसेच बाळासाहेब आम्हांला सवंगडी समजायचे. तुम्ही आम्हांला घरगडी, नोकर समजत होता. हाच तुमच्यात आणि बाळासाहेबात फरक आहे असंही शिंदे म्हणाले.
उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray) ना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता. त्यामुळे ते कुणाला मोठं होऊ देत नाही. कुणी चांगलं भाषण करायला लागले की, भाषण कट करायचं. मी त्यांना सांगायचो, कार्यकर्त्यांना मोठं करा. पण त्यांनी कार्यकर्त्यांना मोठं होऊ द्यायचं नव्हतं. कारण त्यांना दरबारी राजकारण हवं होतं. एवढे सगळे लोक जाताहेत थोडंतरी आत्मपरीक्षण करा. या सगळ्यांच लोकांनी खोके घेतले आहेत का ? असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना विचारला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.