Shivsena News: ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखावर हल्ला; चौघांविरोधात तक्रार दाखल

Dombivli : डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Political News: डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भावे सभागृहाजवळ रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. राजेश पाटील असे तक्रारदार शाखा प्रामुखाचे नाव आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजेश पाटील हे डोंबिवली पश्चिमेतील गांधी गार्डन परिसरात राहतात. सेवानिवृत्त असलेले राजेश पाटील हे शिवसनेच्या ठाकरे गटाचे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात. रविवारी संध्याकाळच्या सुमारास राजेश पाटील हे शाखेत बसलेले असताना त्यांच्या शाखेसमोर वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी शाखेच्याबाहेर एक 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती रस्त्यावर मोबाईलवर बोलत होता.

Shivsena
BJP Political News : '' येत्या 50 वर्षात भाजपला कोणीही हरवू शकत नाही...; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

राजेश पाटील यांनी त्या व्यक्तीला रस्त्यावरून गाडी बाजूला घेऊन फोनवर बोल, अशी विनंती केली. यानंतर फोनवर बोलत असलेला व्यक्ती संतापला. संतापलेल्या व्यक्तीने "तू मला विचारणारा कोण?" असा सवाल करत शिवगाळ केली. तसेच शिव्या देऊ नका, असं बोलणाऱ्या राजेश पाटील यांना धमकावत साथीदारांना घेऊन येण्याची धमकी दिली.

Shivsena
Ashadhi Wari Alandi: आळंदीत लाठीचार्ज झालाच नाही; ती तर झटापट, पिंपरीच्या पोलीस आयुक्तांचा दावा !

त्यानंतर काही वेळाने संबधित व्यक्ती त्याच्या तीन साथीदारांना घेऊन त्या ठिकाणी आला. या चौघांनी मिळून शाखाप्रमुख राजेश पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शाखाप्रमुख राजेश पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

यानंतर त्या चौघांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी केडीएमसीचे शास्त्रीनगर हॉस्पिटल गाठले. उपचारानंतर त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.