

Mumbai News : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून ठाकरे गटाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं भव्य मोर्चा काढला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करतानाच ठाण्यात त्यांचा पराभव करु असं आव्हान दिलं होतं. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायच्या अधिकार आहे. जनता ठरवते. कोणाला निवडून द्यायचं कोणाला पाडायचं. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे असंही शिंदे म्हणाले.
शिवसेना उभी करण्यात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. त्यामुळे जे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले. त्यांच्यावर मी काय बोलणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
अतिशय फ्रस्टेशन ठाण्यामध्ये काल पाहायला मिळालं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. ज्यांच्या काळात दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले, पोलिसाची अब्रू गेली, त्यांची धिंड त्यांनी काढली. कोणी विरोधात बोललं, त्याला जेलमध्ये टाकलं गेलं असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा भाजप नेते नारायण राणेंना जेवणावरून उठवलं. अभिनेत्री कंगना राणावत यांचं घर तोडलं, हनुमान चालीसा बोलणार म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये टाकलं. ही किती गुंडगर्दी होती. हे ते विसरलेत का? अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर प्रत्युत्तर दिले.
उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे बोलू शकले असते पण...
मी काल जे पाहिलं ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संयम बाळगला. ते उद्धव यांना उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे बोलू शकले असते पण ते बोलले नाही. ही संस्कृती आहे. हे सर्व वैफल्यग्रस्त झालेले आहेच. सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा हा खेळ सुरू आहे. सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची जनता ही सगळ्यांना ओळखते. त्यांच्यापेक्षा तिखट आम्हालाही बोलता येतं. आमच्याकडे बरंच काही आहे. आम्ही योग्यवेळी सगळं बोलू असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.