Maharashtra Corona : मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Eknath Shinde : "नागरिकांनी घाबरून जाऊ नये," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : चीनध्ये कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवारी) उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी प्रेझेंटेशन करीत तयारीची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, टेस्टिंग आणि जीनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्याची सूचना या वेळी पंतप्रधानांनी केली. सर्व राज्यांनी आरोग्य सुविधांचे परीक्षण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या. (Eknath Shinde latest news)

महाराष्ट्रात देखील कोरोनाची खबरदारी घेण्यात येत आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी पालकमंत्र्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. "नागरिकांनी घाबरून जाऊ नये," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

"पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Eknath Shinde
Maharashtra Corona : आरोग्य विभाग 'अलर्ट' ; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत यावेळी सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये आहेत. १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

लोकसभा आणि राज्यसभा सभापतींच्या विनंतीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच खासदार गुरुवारी मास्क लावून संसदेत उपस्थित होते. खासदारांनी मास्क लावून देशासमोर उदाहरण ठेवावे,अशी भावना संसदेच्या दोन्ही सभागृहांत सभापती, नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com