युती ही 'लव्ह मँरेज' सारखी ; परत बोलविण्यासाठी उद्धवजींना भाजप पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल !

जोडप्याला पुन्हा घरी यायचं असेल तर दोघांच्या घरातील प्रमुख्यांनी आधी एकमेकांशी चर्चा करावी लागेल.
Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray News, Shivsena News
Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray News, Shivsena Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे काही बंडखोर आमदारही मंत्रालयात उपस्थित होते. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यावेळी उपस्थित होते. (Eknath Shinde news update)

यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता मातोश्री वर जाणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर केसरकर यांनी खोचक पद्धतीनं उत्तर दिलं . "रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवलं गेलं पण आता रिक्षा वाल्यांसाठी स्टॅण्ड तयार करणार," असा टोला मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.(Shivsena Latest Marathi News)

Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray News, Shivsena News
ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार : ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात

"एकनाथ शिंदेंनी आज पदभार स्वीकारला. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आम्ही मोठी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विकासासाठी झोकून काम करणार आहोत. देवाचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री दालन आता सर्वसामान्य लोकांसाठी खुलं झालं आहे.आज तो अनुभव आम्हाला अनेक वर्षांनंतर आला आहे. आजचा दिवस राजकारणाकडे पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे," असे केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray News, Shivsena News
एकनाथ शिंदेंच्या घरात, मुख्यमंत्री दालनात अद्यापही ठाकरेंचेच फोटो

केसकर म्हणाले, "आता भाजप सेना युती झाली आहे. ते लव्ह मँरेज सारखं आहे. आता त्या जोडप्याला पुन्हा घरी यायचं असेल तर दोघांच्या घरातील प्रमुख्यांनी आधी एकमेकांशी चर्चा करावी लागेल. आता आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव साहेबांना भाजपच्या प्रमुखांशी बोलावं लागेल,"

"शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यावर किती प्रेम करतात, ते माहित नाही, ते शरद पवारांच्या जवळचे आहेत. पक्ष धोक्यात आला, हे कळल्यावर माझे प्रयत्न सुरू झाले,तेव्हा मी आमच्या नेत्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला," असे केसकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com