Shiv Sena : आम्हाला डिवचलं तर महागात पडेल ; केसरकरांचे ठाकरेंना आव्हान

आम्हाला धमक्या देतात, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आमच्या प्रादेशिक अस्मितेला डिवचू नका.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता एकनाथ शिंदे (eknath shinde) गट आणि शिवसेना (shiv sena) यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं. (deepak kesarkar latest news)

"उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी गद्दारी केली," असा आरोप आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) काल (गुरुवारी) केला. त्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे.

"उद्धव ठाकरे आजारी असताना आम्ही बंड केलेले नाही. आदित्य ठाकरेंचं आव्हान पोकळ आहे. आम्हाला निवडून येण्याच्या धमक्या देतात, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आमच्या प्रादेशिक अस्मितेला डिवचू नका. आमचा अपमान करु नका, जनता पेटून उठेल. आदित्य ठाकरे तरुण नेते आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा, त्यांच्याबाबत अजूनही आदर आहे, आम्ही आदराने बोलतो, त्यांनीही आदराने बोलावे. आम्हाला डिवचलं तर महागात पडेल," असा इशारा केसरकरांनी यावेळी ठाकरेंना दिला.

"शिवसैनिकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत, म्हणून काही शिवसेना नेते सोबत आहेत. दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड माझ्यासोबत आहे. ज्यांनी शिवसेना उभी केली ते नेते माझ्यासोबत आज पत्रकार परिषदेत आहेत. यांच्या रक्तात शिवसेना नाही का? संजय राठोड यांचं लग्न ठरलं तेव्हा जेलमध्ये होते. भुमरे 5 टर्म आमदार झाले. किती वेळ जेलमध्ये गेले ? याला शिवसेना म्हणतात. या शिवसैनिकांमुळेच आज शिवसेना ताठ मानेनं उभी आहे,"

Deepak Kesarkar
Suhas Kande : शिंदेंच्या हत्येचा कट होता ; तरीही उद्धव ठाकरेंनी झेड प्लस सुरक्षा नाकारली !

"आमची लढाई कॉग्रेस , राष्ट्रवादीविरोधात आहे. शिवसैनिकांची बदनामी करु नका. जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना वेगळ स्थान असतं. शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील. त्यांच्या यात्रा आताच का निघत आहेत,ते इतकी वर्ष महाराष्ट्रात का फिरले नाहीत," असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला.

केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून शिवसेना पाच वर्ष सतेत राहू शकते.हिंदुत्वांच्या विचाराशी ठाम राहिलं पाहिजे, दिशाभूल करुन चालत नाही. उद्धवसाहेब बरे झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली होती, राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडा, असे त्यांनी ठाकरेंना सांगितलं होतं,"

शिंदेंची बदनामी का सुरू

दीपक केसरकर म्हणाले, "तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली, कुठेही आपत्ती आली तर ते धावून गेले, ते आहेत म्हणून शिवसेनेची पाच वर्ष सत्ता आहे,"

कोणाच्या फोनवरून उद्धव ठाकरे फोन करतात

"तुम्ही अनिल परब यांचा फोन चेक करा आणि विचारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता की नाही? आम्हाला माहिती आहे कोणाच्या फोनवरून उद्धव ठाकरे फोन करतात," असे केसरकरांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com