Natasha Awhad news : जितेंद्र आव्हाडांच्या लेकीचं थेट पक्षाला आव्हान; पोस्टने खळबळ, 'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ठिणगी

Delimitation Bill Controversy, Delimitation in India, Natasha Awhad X Post : भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे नताशा आव्हाड यांनी म्हटले आहे.
Natasha Awhad X post.
Natasha Awhad X post.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar NCP latest news : मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. सरकारकडून संसदेच्या अधिवेशनामध्ये पुन्हा हे विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकामध्ये आवश्यक बदल करून सरसकट ५० टक्के जागा वाढविल्या तर पाठिंबा देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले आहे. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या व पक्षाच्या युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे, असेही नताशा आव्हाड म्हणाल्या आहेत.

Natasha Awhad X post.
Rupali Chakankar Trademark : 'ट्रेडमार्क'मुळे नाव, फोटोचा वापर करण्यावर पूर्ण बंदी येते का? चाकणकरांच्या पोस्टनंतर विजय कुंभार यांचा मोठा दावा...

भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे. या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो, असे नताशा आव्हाड यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Natasha Awhad X post.
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो, वैयक्तिक शैलीचा केला ट्रेडमार्क रजिस्टर; वापर केल्यास कोर्टात खेचणार!

दरम्यान, डिलिमिटेशन बिल लोकसभेत मंजूर करण्यासाठी एनडीए सरकारकडून दोन तृतियांश बहुमत मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांसह इंडिया आघाडीतील आणखी काही पक्षांच्या पाठिंब्यासाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. डिलिमिटेशन बिलामध्ये नेमक्या तरतुदी कोणत्या असणार, यावर बरेच अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.