Rupali Chakankar Trademark : 'ट्रेडमार्क'मुळे नाव, फोटोचा वापर करण्यावर पूर्ण बंदी येते का? चाकणकरांच्या पोस्टनंतर विजय कुंभार यांचा मोठा दावा...

Rupali Chakankar Trademark Controversy, Rupali Chakankar News : केवळ सामाजिक किंवा सार्वजनिक कामे करतात म्हणून Class 41 अंतर्गत ट्रेडमार्क मिळण्याचा आपोआप अधिकार निर्माण होत नाही, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
Vijay Kumbhar, Rupali Chakankar
Vijay Kumbhar, Rupali ChakankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Vijay Kumbhar Statement : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांचे नाव, फोटो, ओळख, वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची त्यांची विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी केल्याचा दावा केला आहे. त्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. चाकणकर यांचे नाव, फोटो किंवा त्यांची ओळख वापरल्यानंतर कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीवरून सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी ट्रेडमार्क म्हणजे व्यक्तिमत्त्वावर मालकी हक्क नव्हे, असे म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैली यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी साठी class 41 खाली अर्ज केला आहे, असा दावाही कुंभार यांनी केला आहे.

ट्रेडमार्क नोंदणी झाली किंवा त्यासाठी अर्ज केला म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा कोणत्याही स्वरूपात उल्लेख करण्यावर पूर्ण बंदी येते का? नक्कीच नाही, असे कुंभार यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Vijay Kumbhar, Rupali Chakankar
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो, वैयक्तिक शैलीचा केला ट्रेडमार्क रजिस्टर; वापर केल्यास कोर्टात खेचणार!

चाकणकर यांच्या खाजगी उपक्रमांसाठी Trademark Class 41 लागू होऊ शकतो. मात्र, केवळ सामाजिक किंवा सार्वजनिक कामे करतात म्हणून Class 41 अंतर्गत ट्रेडमार्क मिळण्याचा आपोआप अधिकार निर्माण होत नाही, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला तिच्या ओळखीचा व्यावसायिक गैरवापर, खोटी जाहिरात, बनावट समर्थन किंवा व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन यापासून संरक्षण मिळू शकते. पण त्याच वेळी लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पत्रकारिता, व्यंगचित्र, टीका, कलात्मक अभिव्यक्ती आणि सार्वजनिक घटनांवर आधारित चित्रपट यांनाही महत्त्व आहे, असेही कुंभार यांनी सांगितले आहे.

Vijay Kumbhar, Rupali Chakankar
Congress MLA Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदाराचा राडा; स्टेजवरूनच माईक फेकला, कर्मचाऱ्याला मारायला धावले...

ट्रेडमार्क म्हणजे टीका करण्यावर बंदी नाही. ट्रेडमार्क म्हणजे प्रश्न विचारण्यावर बंदी नाही, आणि ट्रेडमार्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर मालकी हक्कही नाही. कायद्याचा आदर असावा, पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जाऊ नये, असे कुंभार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.