Devendra Fadnavis Vs Sharad Pawar : फडणवीसांचा पवारांवर पुन्हा तिखट वार ; म्हणाले,'' ...त्यांनी तयार केलेलं सरकार मुत्सद्देगिरी आणि शिंदेंची गद्दारी ?

Devendra Fadnavis Reply To Sharad Pawar : '' कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो...''
Devendra Fadnavis- Sharad Pawar
Devendra Fadnavis- Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics : महाराष्ट्रात एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, आता फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत असा टोला लगावला होता. पवारांच्या टीकेवर आता फडणवीसांनी जोरदार पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, माझं म्हणणं एवढंच आहे की, मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो. त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय अशा शब्दांत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

Devendra Fadnavis- Sharad Pawar
DR. Ambedkar Bhavan News : अभिवादन रॅली की, एल्गार मोर्चा; डॉ. आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनात फूट !

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले ते खरं आहे की, १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला असंही फडणवीस म्हणाले.

...पवारांची मुत्सद्देगिरी आणि शिंदेंची बेईमानी...?

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, १९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक बाहेर काढले आणि भाजपा(BJP)बरोबर त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथ शिंदे तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून ५० लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

Devendra Fadnavis- Sharad Pawar
K.Chandrasekhar Rao News : केसीआर यांचे लक्ष राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर; आघाडीचे गणित बिघडवणार?

याचवेळी मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेसबरोबर निवडून आले होते आणि नंतर भाजपाबरोबर आले असं फडणवीस म्हणाले

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते..?

देवेंद्र फडणवीसांनी यांनी रविवारी(दि.२५) एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर टीका करण्यासाठी शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या प्रयोगाचा दाखला दिला होता. “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल फडणवीसांनी केला.

Devendra Fadnavis- Sharad Pawar
Prakash Ambedkar Big Statement : ''...त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबल्या !''; आंबेडकरांचं खळबळजनक विधान

पवारांची खोचक टीका...

शरद पवारांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. पवार म्हणाले, “१९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत असा चिमटाही पवार यांनी फडणवीसांना काढला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.