Disha Salian Case: दिशा सालियनची आत्महत्या की हत्या? 'सीबीआय' सहा वर्षांनंतर सत्य समोर आणणार, 'डॅशिंग' अधिकाऱ्याकडे सोपवली तपासाची जबाबदारी

Disha Salian Death Case: महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना 8 जून 2020 रोजी मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियन या 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसांतच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही संदिग्धरित्या मृत्यू झाला.
Disha Salian Case
Disha Salian_Bombay High Court
Published on
Updated on

Mumbai News: महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बहुचर्चित दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.याप्रकरणाची तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा CBI चौकशी सुरू होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर संबंधित निर्णय दिला.आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून गुरुवारी(ता.10)तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. उपअधिक्षक पुरण कुमार यांची याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीबीआयकडून तपास अधिकारी म्हणून पुरण कुमार यांची एन्ट्री झाल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या दिशा सालियन अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

तसेच पुरण कुमार हे मॉडेल आणि सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनची नेमकी आत्महत्या होती की हत्या, त्यामागं काही राजकीय कनेक्शन होतं का याबाबतचं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

Disha Salian Case
मोठी बातमी : फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावालाच मारहाण; जमिनीचा वाद पेटला, भाऊ अन् पुतण्यावर उपचार सुरू

सुरुवातीला दिशाची हत्या नव्हे तर आत्महत्याच असल्याचा स्पष्ट करत आमच्या मुलीची बदनामी थांबवा अशी भूमिका घेणारे वडील सतीश सालियन यांनी नंतर पोलिसांच्या तपास निष्कर्षांवर संशय व्यक्त करत अनेक सवालही उपस्थित केले दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती.

सतीश सालियन यांनी त्यांची मुलगी दिशाच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करावा आणि हे प्रकरण तपासासाठी सीबीआयला सोपवण्यात यावं,असंही म्हटलं होतं.अखेर कोर्टानं दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

Disha Salian Case
Reservation News: 'आम्ही आरक्षण सोडण्यास तयार,पण जोपर्यंत...'; मोदी सरकारच्या तीनही टर्ममध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याचं खळबळजनक विधान

महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना 8 जून 2020 रोजी मालाड येथील 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियन या 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता.दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसांतच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही संदिग्धरित्या मृत्यू झाला.

दरम्यान,सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू आत्महत्या असल्याचं मानलं गेलं.मात्र,आजही सुशांतच्या मृत्यूवर त्याची बहीण आणि भाऊ संशय व्यक्त करत आहेत.पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या,याचा तपास करून सीबीआय सत्य समोर आणणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com