Shinde-Pawar Will Meet Jarange : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पवार घेणार मनोज जरांगेंची भेट

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे.
Maratha Reservation :
Maratha Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. पण राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र वाटप करावे, यासाठी आपण सरकारला एक महिन्याचा वेळ देऊ, पण जोपर्यंत समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र दिले जात नाही तोपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी व्यक्त केली. पण या एक महिन्यासाठी आपण उपोषण स्थगित करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जरांगे यांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समजूत काढल्यानंतर तरी जरांगे आंदोलन मागे घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation :
Maratha Aarakshan Andolan : निजामी मराठा सामान्य मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही, आंबेडकरांचा थेट आरोप !

दरम्यान, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ हवाय, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. त्यावर राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ देत जरांगे यांनी एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. पण जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही. आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच एक महिन्यानंतर स्वत: मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले इथे येत नाहीत, तोपर्यंत आपण हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्राही त्यांनी घेतला.

काल जरांगे म्हणाले, आम्ही ४० वर्षे आरक्षणासाठी वेळ दिला. पण सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारचं पत्र मिळालं आणि गेलो घरी, असं मी करणार नाही, हा मराठा पोरांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. ३० व्या दिवशी तुम्हाला सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करावे लागतील. ज्या दिवशी प्रमाणपत्र लोकांच्या हातात पडेल, त्या दिवशी आंदोलन बंद करून घरी जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच अहिंसेच्या मार्गाने आंदोलने करा, गाड्या अडवून आरक्षण मिळणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Maratha Reservation :
Chalisgaon BJP News : भाजपच्या पहिल्या दहा आमदारांमध्ये चाळीसगावचे मंगेश चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com