Radhakrishna Vikhe : मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5 हजारांची मदत अंतिम नाही; मंत्री विखे पाटलांनी शिवसेनेला 'पॉलिटिक्स'वरून सुनावले

Radhakrishna Vikhe Patil says the ₹5,000 drought relief is only advance assistance and urges Mahayuti allies to avoid public political disputes : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अंतिम नसल्याचे स्पष्टीकरण; माध्यमांसमोर राजकारण न करता सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra farmer relief : महायुती सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळात दिवाळीसाठी दिलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

पण ही मदत अग्रिम आहे, तर अंतिम नाही, हे सांगताना, महायुतीमधील घटक पक्षांनी माध्यमांसमोर जाऊन, विशेष करून एकनाथ शिंदे शिवसेनेने 'पॉलिटिक्स' करू नये, असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmer) मदतीसाठी राज्यातील महायुती सरकारने दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली असून, त्या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विरोधकांनी देखील त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी देखील या मदतीवरून तिखट प्रतिक्रिया देताना, आपल्या सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. यावर भाजप मंत्री विखे पाटील यांनी महायुतीमधील घटक मित्रपक्षांना, विशेष करून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदाराला 'सबुरी'चा सल्ला दिला आहे.

मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रिम हा शब्दप्रयोग केला आहे. ही रक्कम अंतिम नाही. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांनी माध्यमांपुढे जाऊन बोलण्यापेक्षा, त्यांचे उपमुख्यमंत्री सत्तेत आहेत, त्यांच्याशी बोलावं, विचारविनिमय करावा. पण पाॅलिटिकल स्टोअरी थांबवल्या पाहिजे. दुष्काळात, राजकारण नको आहे. महायुतीच्या लोकांनी पथ्य पाळलेच पाहिजे."

Radhakrishna Vikhe
Farmer sends rs51 money order : दुष्काळी मदत 5 हजारांची; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले 51 रुपये! अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

पालकमंत्री विखे पाटील यांच्याच तालुक्यातून, मतदारसंघातून शेतकऱ्यांकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, एखादा गावाची तक्रार होती. सगळीकडे तक्रार नव्हती. एखादी तक्रार असली तरी ती गंभीर आहे. चौकशीचा आदेश दिला असून, भविष्यात असे काही होणार नाही, याची दक्षता प्रशासनाला घेण्याच्या सूचना केल्या आहे, असे सांगितले.

Radhakrishna Vikhe
Sanjay Raut Supreme Court : ‘दहा वेळा माफी मागेन, पण…’; संजय राऊत यांचा सर्वोच्च न्यायालयाला संदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र झाल्या आहेत. लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली नसल्याने, अनेकांचा लाभ थांबला आहे. ही कारवाई झाली आहे. कोणतीही पात्र लाडकी बहीण वंचित राहणार नाही. लाभार्थ्यांनी केवायसीची पूर्ततेसाठी केली पाहिजे. पोर्टल बंद झाले असेल, तर माहिती घेऊ. लाडक्या बहिणींना योजनेपासून लांब ठेवलं जाणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com