Shivsena Crime: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण ताजं असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नगरसेवकासोबत धक्कादायक घटना, परदेशातून फोन अन्...

Pradeep Purnekar Murder News: ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि धारदार हत्यारांनी वार करुन निर्घृणपणे हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Pradeep Purnekar .jpg
Pradeep Purnekar .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kalyan Dombivali News: ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि धारदार हत्यारांनी वार करुन निर्घृणपणे हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, त्यांच्याकडे तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या फोन कॉलवरून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीच्या फोन कॉलचा ऑडिओदेखील समोर आला असून, त्यामध्ये कथितरित्या 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील धमकी प्रकरणात एच. पी. पुजारी उर्फ अण्णा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होत असून, तो गँगस्टर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पोलीस तपासातूनच पुष्टी होणे बाकी आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता नगरसेवक कुणाल पाटील यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिस या धमकीच्या फोन कॉलचा स्रोत, संबंधित व्यक्ती आणि खंडणीच्या मागणीमागील कारणांचा तपास करत आहेत.

Pradeep Purnekar .jpg
Police Crime : 'श्रेय' घेण्यासाठी निरपराधाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवलं; 23 वर्षांचा तरुण 10 वर्षे तुरुंगात: अखेर कोर्टाचा पोलीस निरीक्षकाला दणका

लोकप्रतिनिधीलाच कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. पोलिस तपासातून या धमकीमागे नेमके कोण आहे आणि २५ लाखांची खंडणी का मागण्यात आली, याचा उलगडा होणार आहे.

ठाण्याच्या मानपाडा परिसरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. 

Pradeep Purnekar .jpg
Amit Shah Jalandhar: पंजाबमधून धक्कादायक बातमी समोर, गृहमंत्री अमित शाहांच्या कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी मंगळवारी रात्रीच प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नऊ पथके तयार केली होती. ठाणे पोलिसांचा  गुन्हे खंडणी विभागाने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. गुन्हे खंडणी विभागाची 3 पथकं व इतर सहा पथकं अशी एकूण 9 पोलिसांची पथके आरोपींच्या मागवर असल्याची माहिती आहे.  आरोपीचा शोध मुंबई व मुंबईबाहेरच्या परिसरात घेतला जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com