

Dombivli News : ठाणे जिल्हावर (Thane District) दावा कुणाचा यावरून आता शिंदे गट आणि भाजप यांच्यातच सुप्त स्पर्धा सुरू आहे. मानपाडा या पोलीस ठाण्यातील (Manpada Police Station) एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या मुद्द्यावरूनही दोहोंमध्ये वाद निर्माण झाला आहे.
ठाणे आमचाच असा शिंदे गट- अन भाजपकडून दावा केला जात असताना यावर आता यांनी शिंदे गटआणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे-भाजप एकाच थाळीचे चट्टे-पट्टे आहेत, असा सणसणीत टोला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी लगावला. (Latest Marathi News)
डोंबिवली शहरात मनसेच्या वतीने पक्ष पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले व आगामी निवडणुकीला सामोर जाण्यासाठी मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमानंतर आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद करताना शिंदे गट -भाजपवला सुनावले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्येच सुप्त संघर्ष होताना दिसून येत आहे. या वादावर ते आमदार पाटील म्हणाले, "शिंदे-भाजप हे एकाच थाळीचे चट्टे-पट्टे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरून उगाच राजकारण करण्याचं तसं काही कारण नाही. गृहखातं तर यांच्याकडेच आहे. हेच बदल्या वगैरे करू शकतात. कुठेतरी वेगळीकडे लक्ष वळवण्याचे हे प्रकार आहेत."
"सध्या जे काही सर्हे आले आहेत, त्यावरून शिंदे गटाला खूप कमी स्थान दिसत आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळावे, यासाठी या दोघांकडून चाललेली ही खेळी आहे का ? असा ही मला संशय येतो. यांची ही नेहमीची सवयच आहे. 2014 प्रमाणे ही लोकं रत्यावर भांडत होते, आजही तसेच भांडत आहेत. भांडून भांडून यांनी पुन्हा युती केली. लोकांचा कुठेतरी लक्ष वळावं, म्हणून यांचे प्रयत्न सुरू आहेत," असे राजू पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.