Rape Case Quashed : ‘प्रेम, गैरसमज अन् बलात्काराचा गुन्हा’; लग्नानंतर हायकोर्टाचा मोठा दिलासा, खटला थेट रद्द!

Mumbai High Court quashed rape case after complainant and accused reconciled, got married, and informed court that their relationship based mutual consent and love : मैत्रीतून सुरू झालेलं नातं वादात अडलं, बलात्काराचा गुन्ह्यानंतर पुन्हा एकत्र येत दोघांनी केलेल्या लग्नावर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Rape Case Quashed
Rape Case QuashedSarkarnama
Published on
Updated on

Mumbai High Court latest judgment : मैत्री झाली, पुढे परस्पर संमतीत नातं सुरू झाले. पुढे मैत्रित वाहवात गेले. दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले, यातून युवतीने मित्राविरोधात थेट बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

हा खटला सुरू होता. पण मधील काळात, दोघे पुन्हा एकत्र आले. युवक-युवतीचे नात्यामधील गैरसमज दूर झाले अन् मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला.

गुन्हा दाखल असतानाच, विवाह करून एकत्र संसार सुरू केला. दोघे पुन्हा न्यायालयासमोर आले अन् सर्व घटनाक्रम नमूद केला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) आता महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

निकालापूर्वी न्यायालयाने घटनाक्रम पडताळणी अन् युवतीने दिलेल्या जबाबाची खात्री करून घेतली. यानंतर हे नाते वासनेवर नव्हे, तर प्रेमावर आधारित होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने (Court) खटला पुढे चालवल्यास दोघांनाही मानसिक त्रास सहन करावा लागेल, असे स्पष्ट करत खटला रद्द केला.

Rape Case Quashed
Girlfriend Family Assault : लव्ह स्टोरीचा दुर्दैवी शेवट! प्रेयसीसोबत दिसताच, बेदम मारहाण; नैराश्यात युवकानं संपवलं जीवन, मुलीच्या वडिलांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकल पीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती. तळोजा पोलिस ठाण्यात सप्टेंबर 2025 मध्ये दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा आणि त्यानंतरचे आरोपपत्र रद्द करण्याची मागणी आरोपीने उच्च न्यायालयात केली होती.

Rape Case Quashed
Wife Harassment Case : सात जन्मांच्या गाठीला 10 दिवसांत पूर्णविराम; पत्नीच्या जाचाला कंटाळून युवकानं उचललं टोकाचं पाऊल

सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी न्यायालयाला सांगितले की, ते पूर्वीपासून मित्र होते आणि परस्पर संमतीने त्यांच्या नात्याची सुरवात झाली होती. मात्र, काही गैरसमज निर्माण झाल्याने युवतीने बलात्कार केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढे संवादातून मतभेद दूर झाल्यानंतर दोघांनी विवाह केला असून, सध्या ते पती-पत्नी म्हणून सुखाने राहत आहेत.

दोघांनी विवाहसंदर्भातील कागदपत्रेही न्यायालयात सादर केली. तक्रारदार युवती स्वतः न्यायालयात उपस्थित राहिली होती. कोणताही दबाव नसताना स्वेच्छेने प्रकरण मिटवल्याचे तिने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. युवतीने दिलेल्या जबाबची न्यायालयाने खात्री केली.

यानंतर सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने आरोपीविरोधातील बलात्काराचा गुन्हा आणि दाखल आरोपपत्र रद्द करत दिलासा दिला. “प्रकरण पुढे सुरू ठेवल्यास संबंधित दोन्ही व्यक्तींवर मानसिक परिणाम होऊ शकतो,” असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com