धक्कादायक! नदीपात्रात दोन तरूण बुडाले , एकाचा मृतदेह मिळाला; दुसऱ्याचा शोध सुरू

River Drowning : पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात दोन मित्र वाहून; एनडीआरएफ, पोलीस व स्थानिकांच्या मदतीने रात्रीभर शोधमोहीम, गितेशचा मृतदेह सापडला तर मानवचा शोध सुरू
River Drowning
River Drowningsarkarnama
Published on
Updated on

दिलीप पाटील

Palgar News : तालुक्यातील उंबरोठे नजीकच्या पिंजाळ नदीवर अंघोळीसाठी गेलेले दोघे तरूण बुडाले असून त्यापैकी एका तरूणाचा मृतदेह मिळाला असून दुस-या तरूणाचा शोध सुरू आहे.ही घटना बुधवारी (दि.16)सायंकाळच्या सुमारास घडली .या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गितेश परिक्षीत पाटील ( वय 16), मानव चरणदास राठोड ( वय16)अशी नदीत बुडालेल्यांची नावे असून त्यापैकी गितेश याचा मृतदेह मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि.16 रोजी सायंकाळच्या सुमारास वाडा शहरातील विवेक नगर येथील तिघे मित्र पिंजाळ नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तिघांपैकी दोघांनी नदीपात्रात उड्या मारल्या मात्र एकाला पोहता येत नसल्याने तो नदीत उतरलाच नाही. तालुक्यात दोन दिवस पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे.या पुराच्या पाण्यात गितेश व मानव हे दोघे जण वाहून गेले.

मात्र घाबरलेल्या तिसऱ्या मित्राने ही हकीकत कोणालाच सांगितली नाही. रात्री त्यांची शोधाशोध झाली असता तिसऱ्या मित्राने ही हकीकत आपल्या वडीलांना सांगितली त्यानंतर शोध सुरू झाला. त्यानंतर वाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी, वाडा पोलीसांचे पथक,वाडा नगरपंचायतीचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने रात्रीच तपास सुरू केला असून आज सकाळी गितेश याचा मृतदेह सापडला असून अन्य एकाचा तपास सुरूच आहे.

River Drowning
Maharashtra Political Live Update : 'कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या..?';इम्तियाज जलील

कुटुंबाचा आक्रोश

तरुण नदी बुडलाची माहिती मिळताच बुडालेल्या तरुणांच्या कुटुंबाने आक्रोश केला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुसरा मृतदेह युद्धपातळीवर शोधला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देखील पोलिस करत आहेत.

River Drowning
Maharashtra Fake Baba : अशोक खरातच्या कारनाम्यांचे सहा महिने अन् भोंदूबाबांच्या अटकेची शंभरी, पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी गोष्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com