Gokul Milk Union Controversy : 'गोकुळ'साठी सरकारने मातब्बर वकील उतरवले; त्यांच्या 'फी'चा आकडा आला समोर...

Adv Mukul Rohatgi Fees, Lawyer Fees : समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर व इतरांनी मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सक्रीट बेंच येथे रिट याचिका दाखल करत अध्यादेशाला आव्हाने दिले आहे.
Devendra Fadnavis, Mukul Rohatgi
Devendra Fadnavis, Mukul RohatgiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Government news : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला कोरमचा पेच सोडविण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात बदल केला. त्यानुसार शासन नियुक्त चार सदस्यांची नियुक्ती करण्याचा अध्यादेश काढण्यात आला.

या अध्यादेशाला कोर्टात आव्हान दिले गेल्यानंतर सरकारने मातब्बर वकील मुकल रोहतगी यांना मैदानात उतरविले आहे. या प्रकरणाची एक सुनावणीही झाली. या केससाठी रोहतगी यांनी तब्बल ८० लाख रुपये फी सरकारकडे मागितली आहे.

सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अअअ (२) परंतुकात सुधारणा करण्याबाबत ६ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढला आहे. गोकुळ दूध संघावर सत्ता काबीज करण्यासाठी सरकारने या अध्यादेशाद्वारे चार सदस्य नियुक्त करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. त्यावरून बरीच टीकाही झाली.

समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर व इतरांनी मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सक्रीट बेंच येथे रिट याचिका दाखल करत अध्यादेशाला आव्हाने दिले आहे. या याचिकेमध्ये शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ व देशाचे माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी यांची ९ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचदिवशी कोर्टात या याचिकेवर पहिली सुनावणीही पार पडली.

Devendra Fadnavis, Mukul Rohatgi
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

रोहतगी यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडत तात्पुरता दिलासाही मिळवून दिला. अध्यादेशाला स्थगिती न देता कोर्टाने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर गोकुळवर महायुतीचे अध्यक्ष विराजमान झाले. चारही सदस्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. मात्र, अद्याप याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रोहतगी हेच यापुढेही कोर्टात सरकारची बाजू मांडण्याची शक्यता आहे.

रिट याचिकेच्या अनुषंगाने शासनाची बाजू मांडण्यासाठी अॅड. रोहतगी यांनी एकूण ८० लाख रुपयांचे देयक सादर केले आहे. त्यानुसार या देयकास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. आयकर कायद्यातील तरतुदीनुसार १० टक्के आयकराची रक्कम कपात करून एकूण ७२ लाख रुपेय इतकी रक्कम रोहतगी यांना दिली जाणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सहकारी विभागाकडून सोमवारी जारी करण्यात आला.

Devendra Fadnavis, Mukul Rohatgi
हकालपट्टी झालेल्या ग्लॅमरस महिला नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी; विधानसभेचे तिकीट मिळणार?

महायुती आणि समविचारी आघाडीमध्ये मोठी चुरस होती. निकालानंतर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. तर आघाडीने १३ जागा मिळवत अध्यक्षपदावर दावा सांगितला. पण कोरमची अडचण निर्माण झाल्यानंतर सरकारने अध्यादेश काढत चार सदस्यांची नियुक्ती केली. त्यामुळे गोकुळ निवडणुकीचे चित्र बदलून गेले. अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्यात आल्याने सरकारने रोहतगी यांच्यासारख्या मातब्बर वकिलांना मैदानात उतरवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.