Maharashtra Politics : मंत्री लोढा यांच्या पुत्राचे अवैध बांधकाम जमीनदोस्त, सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन

Illegal Construction CRZ Violations : कोस्टल रेग्युलेशन झोनच्या (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम उभारण्यात आले होते. त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
Authorities demolish alleged illegal construction linked to minister Mangal Prabhat Lodha’s son over CRZ norm violations.
Authorities demolish alleged illegal construction linked to minister Mangal Prabhat Lodha’s son over CRZ norm violations.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिनंदन लोढा यांच्याशी संबंधित असलेल्या ‘मुंबई माईल रिजनरेशन असोसिएशन’ या संस्थेने वरळी सी-फेस परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेले अवैध बांधकाम महापालिकेने अखेर जमीनदोस्त करण्यात आले.

कोस्टल रेग्युलेशन झोनच्या (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम उभारण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याप्रकरणी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

​वरळी सी-फेस परिसरातील सार्वजनिक शौचालय, उद्यान आणि रोड डिव्हायडरचे सुशोभीकरण करण्यासाठी ‘मुंबई माईल’ या संस्थेने महापालिकेकडून परवानगी मागितली होती. महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाने २४ जून २०२५ रोजी काही अटी व शर्तींच्या अधीन राहून ही परवानगी दिली होती.

मात्र, सुशोभीकरणाच्या नावाखाली या संस्थेने आवश्यक असलेली ‘सीआरझेड’ ना-हरकत प्रमाणपत्र न घेताच शौचालयाचे बांधकाम सुरू केले. ​या अवैध बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती.

Authorities demolish alleged illegal construction linked to minister Mangal Prabhat Lodha’s son over CRZ norm violations.
Education Department Action : पालकांनो, अलर्ट रहा! शिक्षण आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! राज्यात 111 शाळांविरोधात गुन्हा दाखल

माहिती नसल्याचा दावा

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी तक्रारीची दखल घेत या संस्थेला नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर संस्थेने ‘आम्हाला सीआरझेड परवानगीची माहिती नव्हती, असे उत्तर दिले, जे प्रशासनाने फेटाळून लावले. अटींचे उल्लंघन केल्यामुळे सुशोभीकरणासाठी दिलेली मूळ परवानगी प्रशासनाने रद्द करून कारवाई सुरू केली.

Authorities demolish alleged illegal construction linked to minister Mangal Prabhat Lodha’s son over CRZ norm violations.
Harshvardhan Sapkal: मोदींच्या आवाहनानंतर; सपकाळ भडकले! त्याग जनतेने करायचा अन् मोदी फक्त भाषणं देत फिरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com