Arvind Sawant: सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या कळपात गेले आहेत. पण ते एकटेच गेलेले असतानाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, अशी चर्चा सुरु आहे. याला संविधानातील १०व्या अनुसुचीतील विशेष तरतुदीनुसार संरक्षण असल्याचं सांगितलं जात आहे. पण ठाकरेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हा दावा खोडून काढत एक खडा सवाल विचारला आहे? त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
अरविंद सावंत यांनी ठाकरेंचा पक्ष सोडणाऱ्यांना विकाऊ माणसं! असं संबोधताना म्हटलं की, "लोकांनी विचार करायला हवा की हे संविधानाला कसे मानत नाहीत! एकटा माणूस कसा जाऊ शकतो? तुम्ही पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लिहिता ना? मग संविधानातील शेड्युल १०चं काय? मराठी प्रमाणेच संविधान तरतुदींमध्ये विद्वान असलेले अध्यक्ष हे देखील याला योग्यच म्हणणार का?"
सचिन अहिर यांचा दावा आहे की, ते २०२२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले तेव्हा शिवसेना पक्षात फूट पडलेली नव्हती. त्यांची ही टर्म सहा वर्षांसाठी अर्थात २०२८ पर्यंत कायम आहे. त्यामुळं आमदार म्हणून फुटीपूर्वीच्या मूळ शिवसेनेचा आमदार अशीच आपली ओळख कागदोपत्री आहे. त्यामुळं मी जरी आता शिंदेंकडे असलो तरी मूळ पक्षात आहे, असा याचा अर्थ होतो. त्यामुळं मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळं माझं पक्षांतर झालेलं नाही, म्हणूनच मी अपात्र ठरु शकत नाही.
दरम्यान, दुसरीकडं अॅड. असीम सरोदे यांनी सचिन अहिर कसे सुरक्षित ठरु शकतात याबाबत सांगितलं की, "पक्षांतर बंदी कायद्यात दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. त्यामुळं सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेत 5 नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.