Ajit Pawar Vs Jayant Patil : दादांनी आणि मी मिळूनच दुसरं नाव ‘त्या’ मतदारसंघात ठरवलं! जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं...

Maharashtra Assembly Anna Bansode : अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन करताना अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले.
Jayant Patil Vs Ajit Pawar
Jayant Patil Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आता विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांचे अभिनंदन करताना पक्षाध्यक्ष अजित पवारांनी 2019 मध्ये बनसोडेंना मिळालेल्या उमेदवारीचा किस्सा सांगितला. सुरूवात अजिदादांनी केली आणि त्याचा शेवट तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच सभागृहात केला. अजितदादांचे म्हणणे खोडून काढत पाटलांनी त्यात भर टाकली.

काय म्हणाले होते अजितदादा?

2019 च्या उमेदवारीवर बोलताना अजित पवार म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत अण्णाला तिकीट नाकारले. सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिल्यानंतर मी गप्प बसलो. जयंत पाटील यांना म्हंटलं की, अण्णांचं तिकीट कशाला कापलं. त्यावर दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होतं नाही, असे ते म्हणाले.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Sarada Muraleedharan : संपूर्ण राज्याची जबाबदारी खांद्यावर; पतीशी तुलना होताच भडकल्या...

जिल्हा मोठा असल्याने जयंत पाटील यांनी आपल्याला दोन एबीफॉर्म जास्त दिल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यानंतर त्याला एक एबीफॉर्म बनसोडे यांना मध्यरात्री एक्सप्रेस वे वर दिल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवारांनंतर काही वेळाने बोलण्यास उभे राहिलेल्या जयंत पाटील यांनी त्यात आणखी भर टाकली.

वस्तुस्थिती अशी आहे की...

तिकीटे ठरवताना कुणी काय ठरवलं हे सांगायचं नसतं हा रीतिरिवाज आहे, अशी सुरुवात करत जयंत पाटील म्हणाले,  माझा दोष असा आहे की, कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि ते का दिलं, हे मी कधीही कुणाला सांगितलं नाही. पक्षात एकोपा राहावा, एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये, पण त्याला रिझल्ट मिळावा, असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु दादांनी तिकडे गेल्यामुळे अतिशय खुलेपणाने बनसोडे यांना कसं तिकीट मिळालं हे सांगितलं.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Jayant Patil News : नार्वेकरांच्या मनपरिवर्तनासाठी जयंत पाटलांची बॅटिंग; भास्कर जाधवांचा निर्णय आजच होणार?

 वस्तुस्थिती अशी आहे की, दादांनी आणि मी मिळूनच दुसरं नाव त्या मतदारसंघात ठरवलं. त्यानंतर दादा गेले पुण्याला. पुण्यातच त्यांना टोलनाक्यावर काही लोकांनी घेराव घातला आणि तिकीट बदलून अण्णांना देण्याची मागणी केली. त्यानंतर दादांचा मला फोन आला, जयंतराव असं-असं आहे. काय करायचं. त्यावर मी म्हटलं, दादा तुमचा जिल्हा आहे, तुम्ही निर्णय घ्या. मग दादा म्हटले, एक एबी फॉर्म लागेल. त्यावर मी म्हटले एक एबीफॉर्म पुण्यात आहे. तो फॉर्म बनसोडेंना दिला. आणि ज्यांना तिकीट मिळालं होतं, त्यांना मी कळवलं, तुम्हाला फॉर्म दिला असला तरी तुम्ही फॉर्म भरू नका, असा किस्सा जयंत पाटील यांनी सांगितला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com