Jitendra Awhad News : संभाजी भिडेंची लायकी काढत जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; म्हणाले...

Jitendra Awhad On Sambhaji Bhide : राज्यातील सर्व्हे विरोधात असल्याने सत्ताधाऱ्यांची चलबिचल
Jitendra Awhad, Sambhaji Bhide
Jitendra Awhad, Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धगधगणारे मणिपूर, वाढती महागाई, राज्यातील दंगलीपासून लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी संभाजी भिडे नामक व्यक्तीला राज्यात काहीही वक्तव्य करण्याची मोकळीक दिली आहे. राज्यातील निवडणुकांबाबात आलेल्या सर्वेक्षणांमुळे सत्ताधारी चलबिचल झाले आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, भिडे यांची लायकी काढल्याने भाजप आव्हाडांवर तुटून पडण्याची शक्यता आहे. परिणामी अधिवेशनानंतर पुन्हा एकदा भिडे यांच्यावरून राज्याचे राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

Jitendra Awhad, Sambhaji Bhide
Uddhav Thackeray Vs BJP : अफजलखान, औरंगजेबनंतर ठाकरेंना इंग्रजांची उचकी; आशिष शेलारांचा पलटवार

खासगी वृ्त्तवाहिनीशी बोलताना आव्हाडांनी संभाजी भिडेंचे शिक्षणावर बोट ठेवले. तसेच महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून भिडेंचा समाचारही घेतला. आव्हाड म्हणाले, "संभाजी भिडे अकरावी नापास असताना ते 'अॅस्ट्रॉ फिजिक्स'चे प्राध्यापक म्हणून घेतात. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भिडे राज्यात द्वेषपूर्ण वक्तव्य करत फिरत आहेत. भिडेंची महात्मा फुले, महत्मा गांधी, नेहरु यांच्याबाबत बोलण्याची लायकी आहे का? सांगलीत दंगल झाली, भीमा कोरेगावच्या दंगलीमागे भिडेच होते. ही व्यक्ती विकृत आहे. त्यांना अटक करण्याचे सोडून सरकार भलतेच खुसपट काढत आहे."

Jitendra Awhad, Sambhaji Bhide
Jitendra Awhad On BJP : भाजपचं नाव काढताच आव्हाडांनी मुरडलं नाक; म्हणाले, "हा तर माझा..."

राज्य सरकार अस्थिर का झाले आहे, याबाबतही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी कारण सांगितले. "राज्यातील सर्व सर्वेक्षण सत्ताधाऱ्यांच्या विरोधतात आहेत. त्यामुळेच राज्यात जे काही करता येईल ते सत्ताधारी करताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे महापालिकेचा सर्वे विरोधात गेला आहे. राज्यातील लोकसभेच्या जागा आणि विधानसभेचा सर्व्हे विरोधात गेला आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष अस्थिर झालेले आहेत. यातून राज्यातील स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे," अशी टीका आव्हाडांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली.

Jitendra Awhad, Sambhaji Bhide
Kumar Saptarshi PIL Filed ON Bhide : भिडेंच्या अडचणीत वाढ ; कुमार सप्तर्षीं यांच्याकडून जनहित याचिका दाखल

दरम्यान, अधिवेशनात संभाजी भिडेंवरून विरोधक आणि भाजपमध्ये चांगलेच रणकंदन झाले होते. त्यावेळी भिडे आमच्यासाठी गुरुजीच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले होते. यानंतर आव्हाडांनी भिडे यांच्यासह भाजपवरही थेट हल्लाबोल केला आहे. यामुळे भाजपकडून आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे भिडे यांच्यावरून राज्यात पुन्हा एकदा विरोधक आणि भाजपमध्ये घमासान होईल.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com