

Rahul Narvekar: राज्य विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून सकाळी विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात बोलताना एक इंग्रजी शब्द वापरला त्यावरुन विरोधीपक्षातील आमदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. हा इंग्रजी शब्द आम्ही कधीही ऐकलेला नाही त्यामुळं या शब्दांचा नेमका अर्थ काय? याची माहिती आता आम्ही काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनाच विचारणार आहोत, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आव्हाड म्हणाले, ज्या पद्धतीनं अध्यक्ष चुकीच्या प्रथा-परंपरा आपलं अगाध कायदेशीर ज्ञान दाखवत त्यात संविधानिक तरतूद सांगत होते, तसंच इंग्रजीतले काही क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं आम्हाला वाटायला लागतं आणि मग आम्ही घाबरुन खाली बसतो. अध्यक्ष महोदय आम्ही खूप हुशार आहोत, आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आमचा बाप भलेही कुलाब्यात नसेल गावी जन्माला आला असेल. पण आज तुम्ही वापरलेल्या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय? हे विचारायला आम्ही उभं राहिलो होतो. पण आता आम्ही शशी थरुर यांना ई-मेल करुन पाठवतो हा शब्द की याचा अर्थ काय आहे? याची विचारणा करण्यासाठी. कारण चॅट जीपीटीमध्ये त्याचा अर्थच कळत नाहीए. अबंडंड कॉशन काहीतरी आहे तो शब्द त्यांनी वापरलेला.
पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांकडून लपवण्यासाठी ते काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करत आहेत, हे अध्यक्ष असं का करत आहेत? या सभागृहाची प्रतिष्ठा टिकली पाहिजे, या सभागृहाचं मुल्यांकन कमी होता कामा नये. हे सभागृह महाराष्ट्राची इज्जर-इभ्रत राखणार आहे. तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर राजकीय चारित्र्यावर अत्याचार होतोय हे तुम्हाला दिसत नाही का? आता तरी सुधरा, आता तरी मर्यादांचं पालन करा. केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली चार-दोन काम होतात म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर तुम्ही महाराष्ट्राला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.