KDMC News : 'माज आलाय, बोलू नका नाहीतर...', अधिकाऱ्यांना झाप झाप झापले; महासभेत वादळ!

KDMC Mallesh Shetty Vs Yogesh Godse : महापालिकेच्या पहिल्याच सभेत नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली. अतिरिक्त आयुक्तांना थेट बोल नका, असा इशारा नगरसेवकाने दिला.
Shiv Sena corporator Mallesh Shetty in a heated verbal exchange with KDMC Additional Commissioner Yogesh Godse.
Shiv Sena corporator Mallesh Shetty in a heated verbal exchange with KDMC Additional Commissioner Yogesh Godse.sarkarnama
Published on
Updated on

KDMS News : महापौर आणि उपमहापौर पद निवडीसाठी मंगळवारी बोलावलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सभागृहात अधिकाऱ्यांना थेट झापत “तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. बोलू नका, नाहीतर बाहेर पडा” असे स्पष्ट शब्दांत सुनावले. अधिकाऱ्यांना माज आला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीनंतरच्या भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादामुळे महासभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि पहिल्याच दिवशी महासभा चांगलीच गाजली.

दरम्यान, महापौर व उपमहापौर पदनिवडीच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये टोलवाटोलवीही पाहायला मिळाली. आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर खोचक टोला लगावला.

Shiv Sena corporator Mallesh Shetty in a heated verbal exchange with KDMC Additional Commissioner Yogesh Godse.
Ajit Pawar Tribute Removal : सभापती शिंदेंच्या ताब्यातील नगरपालिकेचा ‘प्रताप’! अजितदादांचे श्रद्धांजली फलक हटवले; युवक राष्ट्रवादीचा संताप

ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर आपल्या 8 नगरसेवकांसह सभागृहात दाखल झाले. ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले मात्र त्यातील 4 नगरसेवक गायब असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. त्यावरून पोटे यांनी बोरगावकर यांना “तुम्ही निवडून आलात तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली,” असे म्हणत सचिन पोटे यांनी उबाठा गटनेत्यांवर शाब्दिक कोडी केली. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच खसखस पसरली.

सत्ताधारी-विरोधक संघर्ष पेटणार

पोटे म्हणाले, आपले मित्र म्हणजेच शिवसेनेतून भाजपात गेलेले दीपेश म्हात्रे यांना देखील चिमटा काढायला ते विसरले नाहीत. उप महापौरपदी राहूल दामले यांचा अर्ज आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी मला वाटलं दीपेश म्हात्रे उपमहापौर होतात असे म्हणत त्यांनी दीपेश यांना चिमटा काढला.

महापौर–उपमहापौर निवडीच्या दिवशीच प्रशासन आणि राजकीय पक्षांमधील संघर्ष, तसेच सत्ताधारी–विरोधकांतील शाब्दिक युद्धामुळे आगामी काळात महासभा अधिक तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Shiv Sena corporator Mallesh Shetty in a heated verbal exchange with KDMC Additional Commissioner Yogesh Godse.
Shivsena UBT : 'अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून गांधींनी मोदी, राजनाथ सिंह अन् तथाकथित 'जेम्स बॉण्ड' अजित डोवाल यांची पळता भुई थोडी केली...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com