

Nashik News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व मंत्री दिपक केसरकर यांच्यात शाब्दीक खडाजंगी सुरू झाली आहे. "मंत्रीपदाच्या लालसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बेईमानी केली. उपकारकर्त्याचे उपकार अपकाराने कसे फेडावे, याचे उदाहरण म्हणजे केसरकर असल्याची जहरी टीका राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले,"दीपक केसरकर हा बोलका पोपट आहे. त्यांच्या बेताल विधानांना मी फार महत्त्व देत नाही. फक्त मंत्रीपदाच्या लालसेमुळे त्यांनी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याशी बेईमानी केली. उपकारकर्त्याचेच उपकार अपकारांनी कसं फेडावं, याचं उदाहरण केसरकर आहेत"
राऊत पुढे म्हणाले, "सावंतवाडीत यावेळी निवडणुकीला केसरकर उभ राहून दाखवावं, त्यांचं डिपॉझिटच जप्त करून टाकू. केसरकर यांनी मणिपूरसाठी प्रार्थना करावी. विनायक राऊत (Vinayak Raut) हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधतना त्यांनी केसकरांवर टीका केली.
यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला. "संभाजी भिडे ज्या पद्धतीने बोलले आहेत त्याचा निषेध केला पाहिजे. कोणत्याही महापुरूषाचा अपमान करणे योग्य नाही. भिडेंनी याबाबत तात्काळ दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. भिडे गुरूजी हे नरेंद्र मोदींचे समर्थन करतात, म्हणूनच फडणवीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.