Kiran Pawaskar Reply Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक ; आदित्य ठाकरेंचा बालबुद्धी,मंदबुद्धी उल्लेख...

Mumbai Rain News : '' मुख्यमंत्र्याबाबत असे अपशब्द वापरलं जात असेल तर...''
Kiran Pawaskar, Aaditya Thackeray
Kiran Pawaskar, Aaditya ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊस आला स्वागत करा, पाणी तुंबलं याची तक्रार काय करता असं विधान केलं होतं. या विधानानंतर ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही असा हल्लाबोल केला होता. यानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर जोरदार पलटवार करताना आदित्य ठाकरेंना मंदबुध्दी, बालबुध्दी उल्लेख करत डिवचलं आहे.

किरण पावसकर (Kiran pawaskar) हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांवरील टीकवर बोलताना पावसकर म्हणाले की, ठाकरे घराण्याची जी बालबुद्धी आहे, त्या बाल बुद्धीविषयी सांगायचे तेवढे कमी आहे. मला वाटायचे तो खरोखर बालबुद्धी आहे, पण बालबुद्धी नव्हे तर तो मंदबुद्धी आहे असा हल्लाबोल पावस्कर यांनी केला आहे.

Kiran Pawaskar, Aaditya Thackeray
Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण ईडीच्या रडारवर; 15 ठिकाणी छापेमारी...

बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक एवढ्या लोकप्रियतेवर पोहचतोय याची त्यांना पोटदुखी होतेय. दरम्यान, मुख्यमंत्र्याबाबत असं अपशब्द वापरलं जात असेल तर त्याच्यावर सुमोटा कारवाई करा आणि त्याला अटक करा अशी मागणी किरण पावसकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पावस्कर म्हणाले, ओ बालबुद्धी तु्म्ही जर शॉ़वर घेत असाल ना. तर ते पाणी असेच निघून जात नाही. ते पाणी जायलाही वेळ लागते. मागची 25 वर्ष जे गटाराच्या गाळातून, कचऱ्यातून जो काय पैसा मिळत होता. यातून आपण मोठे झाला आहात, हे विसरू नका. तुमच्या बालपणाचा खर्च त्याच्यातून निघाला आहे अशी टीका देखील किरण पावस्कर यांनी केली आहे.

चाळीत, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असते. पाऊस कधी पडेल आणि त्यांची कधी गरमीपासून सुटका होईल. मात्र, लोकांचा पैसा लुटुन, काहींची मुले ही एसीत बसलेली असतात अशी खरमरीत टीकाही पावसकर यांनी ठाकरेंवर केली.

Kiran Pawaskar, Aaditya Thackeray
Aditya Thackeray on CM: मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे नाकर्तेपणाचा कळस; आदित्य ठाकरे संतापले...

ती घाण 11 महिन्यात स्वच्छ होणार आहे का?

किरण पावसकर यांनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवतानाच मुंबई महापालिकेत 24 वर्षात तुम्ही जी घाण करून ठेवली आहे. कॉन्ट्रॅक्टरपासून, दलाल, गाळ काढणाऱ्यांचे संगळ्यांचेच पैसे खाल्ले आहात, ती घाण 11 महिन्यात स्वच्छ होणार आहे का? असा सवालही उपस्थित केला.

तसेच तुम्ही 608 कोटींचा आरोप करताय, अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही, टेंडरींग प्रोसेस सुरू आहे. त्याच्या आधीच तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय. दिवसभर नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार अन् खोक्यामध्ये बसलेली मंडळी आहात अशी टीका किरण पावसकर यांनी ठाकरेंवर केली आहे. जे मुख्यमंत्री वर्षावरून 4 वेळा मंत्रालयात जाऊ शकले नाहीत ते घटनास्थळी जाणार आहेत का? माजी मुख्यमंत्री(Chief Minister) मुंबईत जागा बघून तरी आलेत का? वॉर रूमच्या बाहेर कधी पडलात का? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्तीच पावस्कर यांनी ठाकरेंवर केली आहे.

Kiran Pawaskar, Aaditya Thackeray
Raosaheb Danve On Opposition Meeting : रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या बैठकीवर मिश्किल टिप्पणी ; म्हणाले, '' मोदी हटावसाठी बैठक की...?''

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते..?

आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. "मुंबईतील रस्त्याला खडी आणि सुशोभीकरणामध्ये कुणी घोटाळा केला? शिंदे गट आणि भाजपने मुंबईत पाहणी करूनही पहिल्याच पावसात पाणी तुंबलं. हा मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा आहे अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली होती.

पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबलं. त्यामुळे पहिल्याच पावसात सरकारचा नाकर्तेपणा यामधून दिसला. खरं तर हे सरकार नालेसफाईंच्या कामाच्या संदर्भात गंभीर नाही. या सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे. हे सरकार म्हणजे स्वत:साठी खोके आणि जनतेसाठी धोके असं हे सरकार आहे अशी खरमरीत टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.