Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कसून तयारी करत आहेत. अशातच आता काँग्रेसचे पुर्वाश्रमीचे नेते आणि नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले मिलिंद देवरा यांनी आपले वडील मिलिंद देवरा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे, 20 वर्षांत पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रचार आपण नक्कीच करणार असे त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)
राज्यसभेचे सदस्य मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, " 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी लोकसभा निवडणूक लढवत नाही, अशी स्थिती समोर आली आहे. दुसरी बाब म्हणजे 44 वर्षांनंतर पहिल्यांदाच माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईच्या (Mumbai) जागेवरुन लोकशाहीच्या मतपेढीचा भाग नसणार आहोत. सलग चार निवडणुकांनंतर मी आता खासदार म्हणून प्रचारासाठी उत्सुक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मिलिंद देवरा (Milind Deora) पुढे म्हणाले, "मी दक्षिण मुंबईतील मतदारांना आश्वासन देऊ इच्छितो की राज्यसभा खासदार म्हणून मी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर माझ्या क्षमतेनुसार त्यांचे प्रतिनिधित्व करत राहीन. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.