Loksabha Election 2024 : मिलिंद देवरा यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, दलित असल्याने वर्षा गायकवाडांना उमेदवारी नाकारली...?

Milind Devra शिंदे गटाचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली असून, या निवडणुकीत दलित समाजाची मते हवी असून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या गटाची दिसते.
Milind Devra, Varsha Gaikawad, Udhav Thackeray
Milind Devra, Varsha Gaikawad, Udhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघावरून उद्धव ठाकरे गट शिवसेना व काँग्रेसमध्ये मतभेद झाले आहेत. ही जागा ठाकरे गटाला मिळाली असून, अनिल परब यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या याच मतदारसंघातून इच्छुक होत्या. यावरून शिंदे गटाचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, या निवडणुकीत दलित समाजाची मते त्यांना हवी असून, त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे गटाची दिसते.

काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून लोकसभेला इच्छुक होत्या. या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद झाले. ही जागा ठाकरे गटाला मिळाली असून, येथून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. यावरुन शिंदे गटाचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली आहे.

या निवडणुकीत दलित समाजाची मते हवी असून, त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या गटाची दिसते. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेतृत्वाला असे सांगितले आहे की, वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर तिकीट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल.

Milind Devra, Varsha Gaikawad, Udhav Thackeray
Mumbai News : अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण; पोलिसांचा तपास संशयास्पद : तेजस्वी घोसाळकर यांचा आरोप

एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत असून ते दुर्दैवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो, असे देवरा यांनी म्हटले आहे. वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची दलितविरोधी मानसिकता दिसून येते, असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्यात जागावाटप झाले आहे. सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ ठाकरे गटाला तर दोन काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. त्यानुसार उत्तर मध्य मुंबई व उत्तर मुंबई या जागा काँग्रेसला तर ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, इशान्य मुंबई हे चार मतदारसंघ मिळाले आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Milind Devra, Varsha Gaikawad, Udhav Thackeray
Varsha Gaikwad News : 'मी नाॅट रिचेबल नव्हते अन् नाराजही नाही पण...' ; गायकवाडांची खदखद आली बाहेर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com