Mumbai News : ठाणे लोकसभा मतदारंसघाची निवडणूक महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि आमदार प्रतापसरनाईक यांच्यापैकी एकाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता आहे. ठाण्याची जागा स्वत:कडे राखण्यात शिंदे यशस्वी राहिलेले आहेत. ठाण्याची जागा अखेर शिवसेना लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर पालघर, दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपचा जोरदार दावा असल्याचा माहिती आहे. (Latest Marathi News)
ठाणे लोकसभेवर सुरुवातीपासून भाजपने दावा केला होता. यासाठी भाजपचे पक्षश्रेष्ठीही आग्रही होते. शेवटपर्यंत या जागेवर भाजपने कायम दावा केला होता. आज अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे. ठाण्याच्या उमेदवारीवर नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांच्यापैकी एका नावावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याची लवकरच घोषणा होऊ शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. यामुळे याबाबतची घोषणा ते मुंबईत आल्यावर होण्याची शक्यता आहे. ते आजच रात्री मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनतर याबाबत अधिकृतपणे पक्षाकडून ठाण्याच्या जागेवरील चित्र अधिक स्पष्ट होईल. आज रात्री किंवा उद्या सकाळी याबाबत घोषणा निश्चितपणे केले जाणार आहे.
पुढील 24 तास राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लोकसभेच्या उर्वरीत सर्व जागांवर उमेदवारांच्या घोषणा होणार आहेत. ठाणे, नाशिक दोन्ही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत अजूनही जोरदार रस्सीखेच सुरूच आहे. ठाण्यातून प्रताप सरनाईक व नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर तर दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा व यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकच्या (Nashik) उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.