

Mumbai News, 26 Feb : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (ता. २६) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त टिपू सुलतान विषयावर देखील भाष्य केलं.
"टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आमचा आक्षेपच नाही, पण टिपू यांची तुलना शिवरायांशी करण्यावर आमचा आक्षेप आहे", असं फडणवीस म्हणाले. तर आपण योग्य वेळी नीट इतिहास शिकवला असता तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो मानलं नसतं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आमचा आक्षेपच नाही. त्यावर चर्चा देखील करू, पण जर कोणी म्हणत असेल की टिपू सुलतान शिवाजी महाराज यांच्या एवढे मोठे राजे होते, तर त्याला आमचा आक्षेप आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं की, शिवरायांएवढं गुणगाण टिपूचं केलं पाहिजे, याला आक्षेप आहे."
तर यावेळी मागील सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोघलांना जास्त महत्व दिल्याचं वक्तव्य देखील फडणवीसांनी केलं. ते म्हणाले, "दुर्दैवाने देशाच्या इतिहासात जी छेडछाड करण्यात आली. त्यात आम्हाला वर्षानुवर्षे हेच शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते. पण हे कधी सांगितलं नाही की, ७५ हजार हिंदूची कत्तल करणारे देखील हेच टिपू सुलतान होते. ते इंग्रजांशी लढले पण स्वत:चं राज्य वाचवण्यासाठी लढले.
खरा इतिहास आता समोर येतोय. सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मोघलांना १७ पानं दिली आणि शिवाजी महाराजांना केवळ एकच पान दिलं. परंतू मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो मानलं नसतं.
पण आपण कधीच खरा इतिहास काय आहे ते कधी शिकवलच नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप नाही. पण जे लोक देशविरोधी लोकांना आणि आक्रमकांना हिरो मानतील त्यांच्या विरोधात लढाई लढू आणि आम्ही त्यांना सोडणार नाही, असं म्हणत फडवीसांनी औरंगजेबाचं उद्दात्तीकरण करण्यांना इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.