Raj Thackeray : 'राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह शरद पवारांचेच तर शिवसेना...' राज ठाकरेंनी जाहीर सभेत सांगून टाकलं

Raj Thackeray Statement on Sharad Pawar: शरद पवारांवर जाहीर टीका करताना मात्र राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटबाबत वेगळीच भूमिका घेतली. तसेच शिवसेना कोणाची हे देखील राज ठाकरे यांनी सांगितले.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी डोंबिलीमध्ये जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. ही टीका करत असताना मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह ही एकनाथ शिंदेंची, उद्धव ठाकरेंची प्रॅपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॅपर्टी आहे. त्याच्यावर तुम्ही कसला दावा सांगताय?

शरद पवारांवर जाहीर टीका करताना मात्र राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटबाबत वेगळीच भूमिका घेतली. ते म्हणाले, माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचे अपत्य आहे. घड्याळ हे त्यांचे चिन्ह आहे. अजित पवार त्याच्यावर कसला दावा सांगतायेत.

Raj Thackeray
Raosaheb Danve : दानवे म्हणतात, जरांगे पाटलांचा निर्णय योग्य, पण भाजपला फायदा होईल का? हे निकालानंतर कळेल..

पक्ष पळवतायेत निशाणा पळवतायेत. महाराष्ट्राकडे सुजान महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं. या गोष्टी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होत होत्या. तसा महाराष्ट्र कारायचा आहे का? असा सवाल देखील राज ठाकरेंनी यांनी विचारला.

मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली. फूट पाडताना म्हणाले मी त्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. माझा श्वास कोंडत होता. पण आता तेच अजित पवार मांडीवर येऊन बसले, असा टोला राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

लाडकी बहीण कशासाठी?

राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी त्यांच्या व्यासपीठावर भोजपूरी गाण्यावर एक महिला नाचते. ही आहे का तुमची लाडकी बहीण योजना. आपण कुठे चाललोय. महिलेनी राजकीय सभेच्या आधी व्यासपीठावर नाचण्याची पद्धती यूपी, बिहारमध्ये आहे. हे आपल्याकडे सुरू झालं. म्हातारी मेली याचं दु:ख नाही पण काळ सोकावतोय.

Raj Thackeray
Devendra Fadnavis : लोकसभेतील पराभवानंतर राजू पारवे विधानसभेच्या रिंगणातूनही बाहेर; फडणवीसांनी दिला शब्द...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com