Maharashtra BJP News : संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासले; भाजपने घेतला खरपूस समाचार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही, नेमका हाच मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजप जाणीवपूर्वक गडकरींचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे.
Sanjay Raut, BJP
Sanjay Raut, BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही, नेमका हाच मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजप जाणीवपूर्वक गडकरींचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले होते. भाजपने आता संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी भाजपने एक्स हॅन्डलवरून ट्विट करत राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.

संजय राऊत म्हणाले...

भाजपला निवडणुकीनंतर अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भाजप (BJP) 220 ते 225 च्या पुढे जागा जिंकणार नाही. अशावेळी नितीन गडकरी यांचे पंतप्रधानपदी कुणी नाव पुढे करू नये, यासाठी आताच त्यांचा दिल्लीतील पत्ता कट करण्याचे काम केले जात आहे. नितीन गडकरी हे व्यासपीठावरदेखील सन्मानाने उभे असतात. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं, असा प्रयत्न आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती.

Sanjay Raut, BJP
Madha Loksabha Constituency : माढ्याचा तिढा सुटणार...भाजपचा बडा नेता उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

त्यांची कीव येते...

संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते, अशा शब्दांत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तर महाविकास आघाडीचे जागावाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मानसिक संतुलन ढासळले...

'काल राऊत यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे', असे भाजपने म्हटले आहे. तर आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर टीका केली, पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधानदेखील होऊ शकतो.

चिंता करू नये...

संजय राऊत ज्यांची चाकरी करतात, त्या उबाठामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षांच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असे भाजप महाराष्ट्रच्या एक्स अकाउंटवर लिहित टीका करण्यात आली आहे.

R

Sanjay Raut, BJP
Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या परभणीत निष्ठावंत बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे कधी सभा घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com