Monsoon Session : सत्ताधारी-विरोधक भिडले ; आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, गोगावलेंची कबुली

monsoon session : आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही," असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.
monsoon session
monsoon sessionsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदार आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. सत्ताधारी-विरोधक आमदार आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला.

"आम्ही जे केले नाही ते आरोप विरोधकांनी केले. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही," असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. 50 खोके आम्ही काही घेतले नाही, यांचे अनिल देशमुख, नवाब मलिक आतमध्ये का बसलेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"सगळा घोटाळा बाहेर काढल्याने पोटशूळ उठला. ​​​​आम्ही काम करत होतो आणि हे लोक त्यावेळी खात होते,त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली नाही आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली," अशी कबुली गोगावलें यांनी केली.

"आता आम्ही आंदोलन केले तर ते त्यांना का मिर्च्या झोंबल्या? त्यांचे सगळे घोटाळे बाहेर काढले. कोरोनात झालेला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा, अनिल देशमुखांपासून, नवाब मलिक, सचिन वझे, परब सर्वांचे घोटाळे बाहेर काढले. आमचे आंदोलन पूर्ण झाल्यावर त्यांनी यायला हवे होते. त्यांनी सगळ्यांचे लक्ष विचलित केले, हा कुठला प्रकार? असे गोगावले म्हणाले.

शिवीगाळ झाल्याचा आरोप

एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी शिवीगाळ केली, असा दावा आमदार अमोल मिटकरीं यांनी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी शिवीगाळ केली, असे मिटकरी यांनी सांगितले. आई - बहिणीवरुन शिवीगाळ झाल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत होते. आज मात्र या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

monsoon session
Naresh Mhaske : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली नवीन जबाबदारी

काल (मंगळवारी) मुंबईतील खड्डे, वाहतुक कोंडी या प्रश्नावर चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. अधिवेशनाचे राहिलेले दोन दिवस वादळी ठरण्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.

वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के, अशा घोषणा शिंदे गटाने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. 'बीएमसीचे खोके- मातोश्री ओके', 'लवासाचे खोके- बारामती ओके,' अशा घोषणादेत सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com