भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं ; आंबेडकरांचा टोमणा

फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं.
Prakash Ambedkar News, Devendra Fadnavis News, Political News
Prakash Ambedkar News, Devendra Fadnavis News, Political Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते नाराज असल्याची चर्चा आहे. यावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे. भाजपच्या केंद्र नेतृत्वाने त्यांचा अपमान केल्याची चर्चा आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खोचकपणे प्रतिक्रिया दिली आहे. (Prakash Ambedkar news)

"पुलोदचं सरकार झाले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते.शंकरराव चव्हाण हे त्या अगोदर कॉग्रेसचे मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरुन ते पुलोदमध्ये सहभागी झाले. ते अर्थमंत्री झाले. दिल्लीवरुन आलेला आदेश शंकरराव यांनी मानला. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मानला. फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना त्यांनी पक्षश्रेष्ठींना आदेश मानला. ते उपमुख्यमंत्री झाले. "केंद्रातील नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचे शंकरराव चव्हाण केलं," असा टोला त्यांनी लगावला.

Prakash Ambedkar News, Devendra Fadnavis News, Political News
Devendra Fadnavis: फडणवीसांचा हा फक्त ट्रेलर, मोठा चित्रपट यायचायं !

महाविकास आघाडीकडे रणनीती नाही,असे आंबेडकर म्हणाले. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. फडणवीस सरकारवर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते, असे ते म्हणाले.

"राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या असताना सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावा लागेल," असे आंबेडकर यांनी सांगितले.

"उद्धव ठाकरे विकासाच्या कामात स्पीड ब्रेकर होते, आता विकासाची काम गतीमानपणे होतील. शिंदे सरकार योग्य पद्धतीने काम करणार, जनतेचा सुप्रशासन देणार," असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले. "बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे, ते त्यांना विरोध करीत आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना बरोबर आहोत," असे शेलार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com