Amol Mitkari : मिटकरींचा आमदारकीचा शेवटचा दिवस : अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत इथून पुढचा प्रवास कसा असणार ते केलं स्पष्ट...

Amol Mitkari MLA Tenure Ends : 'मागील सहा वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. संघर्ष पाहिला, टीका सहन केली, प्रसंगी एकटेपणही अनुभवले; पण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला विश्वास आणि प्रेम हेच माझं खरं बळ राहिलं. विधान परिषदेत आवाज उठवताना मी नेहमी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढण्याचा प्रयत्न केला.'
Amol Mitkari
NCP leader Amol Mitkari shared emotional memories from his legislative council tenure along with photos featuring late deputy CM Ajit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 May : राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांच्या आमदारकीचा आज शेवटचा दिवस आहे. याच निमित्ताने पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी आपल्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी आमदारकीच्या कार्यकाळातील आठवणी आणि आमदारकीनंतरची वाटचाल नेमकी कशी असेल याबाबतचे संकेत दिले आहेत. तसंच या पोस्टमध्ये मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज दिनांक १३ मे २०२६ रोजी माझा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आहे. आयुष्यातील हा केवळ एका पदाचा शेवट नाही, तर एका वादळी, संघर्षमय आणि शिकवण देणाऱ्या राजकीय प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.

मागील सहा वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. संघर्ष पाहिला, टीका सहन केली, प्रसंगी एकटेपणही अनुभवले; पण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला विश्वास आणि प्रेम हेच माझं खरं बळ राहिलं. विधान परिषदेत आवाज उठवताना मी नेहमी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढण्याचा प्रयत्न केला. राजकारणात भूमिका घेताना अनेकदा वादळं आली, पण त्या प्रत्येक वादळाने मला अधिक मजबूत केलं.

या प्रवासात उपमुख्यमंत्री अजितदादांचे मार्गदर्शन, विश्वास आणि साथ मला सतत मिळत राहिली. त्यांनी दिलेल्या संधीमुळे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. त्यांच्याप्रती मी मनापासून कृतज्ञ आहे. आज दादा नाहीत हे कटू सत्य व त्यांच नसणं हे जीवनातील सर्वात मोठं संकट आहे. त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकणार नाही, अशा शब्दात अजितदादांच्या आठवणींना मिटकरी यांनी यावेळी उजाळा दिला.

Amol Mitkari
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; शिकाऊ वैमानिक सुरक्षित

तसंच त्यांनी पुढं लिहिलं की, आज पद संपत असलं तरी जनतेशी असलेलं नातं संपणार नाही. कारण माझ्यासाठी राजकारण हे केवळ पदासाठी नसून विचारांसाठी, नात्यांसाठी आणि समाजासाठी आहे. या काळात असंख्य जिवाभावाचे मार्गदर्शक मित्र जुळले ज्यांची सोबत प्रेरणा जागवणारी राहिली.

१४ मे पासून मी एका नव्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. हा प्रवास अधिक संयमी असेल, अधिक प्रगल्भ असेल आणि महाराष्ट्राच्या मातीशी आणखी घट्ट नातं जोडणारा असेल, असं म्हणत त्यांनी नव्या प्रवासाचे संकेत दिले. तर संघर्ष अजून संपलेला नाही; उलट नव्या उमेदीने पुन्हा उभं राहण्याची ही वेळ आहे. ज्यांनी प्रेम दिलं, टीका केली, साथ दिली आणि विरोध केला त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. कारण प्रत्येक अनुभवाने मला घडवलं, असं म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Amol Mitkari
Pune BJP Conflict : ​पुणे भाजपमध्ये 'ऑल इज नॉट वेल'; महापौरांच्या बैठकीने गटबाजीचा 'धूर' पुन्हा वर!

तर माझा विश्वास आजही कायम आहे, “वादळं कितीही मोठी असली आणि मातीशी नातं प्रामाणिक असलं, तर प्रवास कधीच थांबत नाही.” अशा शब्दात मिटकरी यांनी आपल्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सूचक ट्विट केलं आहे. त्यामुळे आता मिटकरी यांची आगामी वाटचाल नेमकी काय असणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com