

Thane News : ठाणे शहरात वाहन टोल दरवाढविरोधाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनारस्त्यावर उतरत आक्रमक झाली आहे. मनसे ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून टोल दरवाढीविरोधात उपोषण करत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव उपोषण करीत असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (Latest Marathi News)
या वेळी राज ठाकरे म्हणाले, "मनसे टोलविरोधात गेली अनके वर्षे आंदोलन करत आहे. आमच्या पक्षाच्या आंदोलनांमुळे राज्यातील ६५ टोल नाके बंद झाले. या आधीच्या शिवसेना-भाजप सरकारच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१९ च्या वेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा देण्यात आली होती. ते कुणाच्याही लक्षात नाही, पण मला सगळे विचारतात की, तुमच्या टोल आंदोलनाचं काय झालं? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
"मुंबईच्या परिसरात असलेले टोल नाके हे म्हैसकारांकडे आहेत. हे कोण एवढे यांचे लाडके म्हैसकर आलेत? या टोलच्या विरोधात आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पिटीशन (याचिका) केली होती. मला मुख्यमंत्री शिंदेंनाही हा प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी हे मागे का घेतलं? आणि कुणी त्यांना मागे घ्यायला लावलं? एका बाजूला तुम्ही लोकांना आश्वासन देता की, टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि प्रत्यक्षात वेगळ्या गोष्टी करता," असा हल्लाबोलही राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.